Header Ads

Ahmednagar Bjp: 60 रु. किलोने हरभरा डाळ मिळणार: सुवेंद्र गांधी

 Ahmednagar Bjp:  सर्वसामान्यांना दिलासा... 60 रु. किलो दराने हरभरा डाळ मिळणार:सुवेंद्र गांधी

Ahmednagar Bjp:  सर्वसामान्यांना दिलासा... 60 रु. किलो दराने हरभरा डाळ मिळणार:सुवेंद्र गांधी


Ahmednagar Bjp:  अहमदनगर (प्रतिनिधी): दसरा-दिवाळच्या सणानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्यावतीने सर्वसामान्यांना दिलासा दायक निर्णय घेण्यात आला आहे.  मागेल त्याला डाळ योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना फक्त 60 रुपये प्रतिकिलो दराने हरभरा डाळ मिळणार आहे.


  शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या आनंदधामजवळील निवासस्थानी  हे विक्री सुरु करण्यात आले आहे.


     याबद्दल माहिती देतांना सुवेंद्र गांधी म्हणाले, सध्या महागाई वाढत आहे. अशा परिस्थिती भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना फक्त 60 रुपये किलो दराने हरभरा डाळ उपलब्ध करुन देत मोठा दिलासा दिला आहे. 


दसरा-दिवाळीच्या सणानिमित्त सुरु करण्यात आलेल्या योजनेचा सर्व नागरिकांना लाभ घ्यावा. राज्यातील युती शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मागेल त्याला डाळ ही योजना सुरु करण्यात आली आहे.


 यासाठी नाफेडच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळखपत्रावर 5 किलो प्रतिव्यक्ती डाळ उपलब्ध करुन दिली आहे.


     दाळ खरेदीसाठी आधार कार्ड  सक्तीचे असून, लाभार्थीं नागरिकांनी येतांना कापडी पिशवी बरोबर आणावी, ही योजना स्टॉक असेपर्यंत  चालू सुरु राहणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुवेंद्र गांधी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.