Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बी. बी.ए विभागातर्फे 'वर्ल्ड इनव्हेस्टर 2023 वीक' साजरा

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बी. बी.ए विभागातर्फे 'वर्ल्ड इनव्हेस्टर 2023 वीक' साजरा

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बी. बी.ए विभागातर्फे 'वर्ल्ड इनव्हेस्टर 2023 वीक' साजरा
Ahmednagar College: अहमदनगर (प्रतिनिधी):  नुकतीच अहमदनगर महाविद्यालयातील बीबीए विभागातर्फे 'वर्ल्ड इनव्हेस्टर 2023 वीक च्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये नगरमधील सर्व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

      या स्पर्धेचे उद्घाटन' महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 

       यावेळी  प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी विद्यार्थ्यांना  पुढील आयुष्यात गुंतवणुक आणि बचत या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले, अश्या स्पर्धाच्या' आयोजनामुळे गुंतवणुकीबद्दल विदयार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण होईल व भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कशी गुंतवणूक करावी, कुठे गुंतवणुक करावी, गुंतवणुकितील धोके कसे ओळखावे या अभ्यासाची सुरुवात लहान वयातच होईल, असे प्रतिपादन केले.

           कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पोस्टर प्रेझेंटेशन व एसे कॉम्पीटिशन देण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश विभागप्रमुख डॉ. तुषिता अय्यर यांनी स्पष्ट केला व आभार प्रदर्शन प्रा. सपना स्वामी यांनी व्यक्त केले.

         कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात क्वीझ कॉम्पीटिशन घेण्यात आले व नंतर पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उप-प्राचार्य प्रो. डॉ. प्रितम बेदरकर होते. त्यांनी विजेत्यांना बक्षीस देवून त्यांचे कौतुक केले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीबीएचे विद्यार्थीनी कु.संचिता पवार आणि कु· साक्षी ठोसर यांनी केले. व आभार प्रदर्शन, विद्यार्थी रोशन वर्मा यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन बी.बी.ए. च्या विदयार्थ्यांनी केले होते. तसेच मार्गदर्शन प्राध्यापकांनी केले होते. कार्यक्रमात बी. बी.ए. प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

     विजेत्यांची नावे - पोस्टर प्रेझेंटेशन -  सुजीत नरके, अहमदनगर कॉलेज,   द्वितीय. सय्यद कनीज इनतीमा समीर - अहमदनगर कॉलेज, तृतीय- केशव गौड - अहमदनगर कॉलेज, आणि उत्तेजनार्थ श्रेया गुरूंग - अमन -  एस. आर. इ. एफ.कॉलेज

      एसे कॉम्पीटिशन - प्रथम- सीया गुंदेचा - एस.आर. ई.एफ. कॉलेज, द्वितीय चोया गुरूंग एस. आर. ई. एफ. कॉलेज, तृतीय शेख झीनत जावेद- अहमदनगर कॉलेज ,उत्तेजनार्थ - कौस्तुभ चोपड़ा, एस आर ई. एफ कॉलेज , सृवही तन्वर एस. आर. ई. एफ कॉलेज  

        क्वीझ कॉम्पीटिशन - प्रथम सृष्टी नन्वर आणि सीया गुंदेचा- एस. आर. ई. एफ.कॉलेज, द्वितीय अर्थव मुळे आणि चिन्मय दसरे - सारडा कॉलेज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.