Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात दि.१८ ऑक्टोंबर रोजी 'Tech-Fun 2023'

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात दि.१८ ऑक्टोंबर रोजी 'Tech - Fun 2023' प्रदर्शन व विविध स्पर्धेचे आयोजन 

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात दि.१८ ऑक्टोंबर रोजी 'Tech - Fun 2023' प्रदर्शन व विविध स्पर्धेचे आयोजन


Ahmednagar College: अहमदनगर :  अहमदनगर महाविद्यालयात संगणकशास्त्र विभाग हा मागील दशकापासून Techno - Mutation हे संगणक शास्त्रातील विविध प्रकल्पांचे प्रदर्शन भरवीत आहे. परंतु या वर्षापासून विभागाने याची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले आणि 'Tech- Fun 2023' या अंतरमहाविद्यालय स्पर्धेचे दिनांक १८/१०/२०२३ रोजी नियोजन करण्यात आले. अनेक वर्ष हे प्रदर्शन फक्त ज्युनिअर कॉलेजेस पुरतेच मर्यादित होते, परंतु आता सर्व पदवीचे विद्यार्थीही यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत.

           दिनांक १८ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा दोन विभागांमध्ये ( सकाळ व दुपारी) होणार आहे. सकाळच्या विभागामध्ये Blind Coding, Quiz, Poster या स्पर्धा होतील, तर दुपारच्या विभागात वादविवाद स्पर्धा आणि प्रदर्शनाचे नियोजन करण्यात येणार आहे. 

स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत तसेच ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी जास्त बक्षीस मिळतील अश्या महाविद्यालयाला 'Best College' ट्रॉफी देण्यात येणार आहे.  

         इयत्ता ११ वी पासून तृतीय वर्ष पदवी पर्यंतचे विविध महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकतात. यास्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून ५०/- प्रवेश शुल्क प्रति विभाग आकारण्यात येणार आहे. 

सहभागी सर्व विध्यार्थ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सय्यद रज्जाक (9421556535) यांनी केले आहे.

      अधिक माहितीसाठी अहमदनगर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागास संपर्क करावा. रजिस्टेशन करण्यासाठी ऑनलाईन फॉर्मची लिंक पुढीलप्रमाणे- 
https:// tinyurl.com/techfun 2023 रजिस्टेशनची अंतिम मुदत दि.१४ ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.