Header Ads

Ahmednagar College: प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केले तर नोकरीची संधी उपलब्ध : प्रशांत दहिभाते

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात 'आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी व नोकरी मिळवायची' या विषयावर  व्याख्यान

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात 'आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी व नोकरी मिळवायची' या विषयावर  व्याख्यान

 Ahmednagar College:  प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केले तर नोकरीची संधी आपल्यासमोर उपलब्ध होईल- प्रशांत दहिभाते


Ahmednagar College:  अहमदनगर (प्रतिनिधी)  :  आजच्या आधुनिक जगात आयटी क्षेत्राचे महत्व वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस याचे महत्व वाढत जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढत राहणार असून त्यासाठी फक्त अभियांत्रिकीचीच शाखा असलीच पाहिजे असे काही नाही.


 विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील पदवी असली आणि आयटी नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केली की, नोकरीची संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे, असे प्रतिपादन प्रशांत दहिभाते यांनी केले.


       अहमदनगर महाविद्यालयात संगणक विभागातील विद्यार्थ्यांना 'आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी व नोकरी कसे मिळवायचे' यावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशांत दहिभाते बोलत होते.  प्रशांत दहिभाते यांचा अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक सत्कार केला.


        पुढे बोलताना प्रशांत दहिभाते म्हणाले की, आयटी क्षेत्रात नवनवीन कल्पनांना वाव असतो. त्यामुळे कोणीही त्या कल्पना मांडू शकतो. ती कल्पना कागदावर मांडून त्यावर संशोधन केले जाते. हे काम डेव्हल्पर्स करतो. आणि त्यातून एखादे सॅफटवेअर प्रत्यक्षात निर्माण होते. कल्पना सुचण्यासाठी तुम्ही कोणत्या शाखेचे आहात हा प्रश्न येत नाही. त्यामुळे या आयटी क्षेत्रात काम करण्याची सुरवात कधीही करता येऊ शकते. या बाजारात हजारो कौशल्ये आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत.


 मात्र यासाठी संगणकीय भाषाचे ज्ञान आवश्यक असते. सोप्या भाषेचे ज्ञान घेऊन आयटीत कामाची सुरवात करता येते. अनुभवाने ज्ञान वाढते. त्यामुळे एकदा पाया पक्का होणे आवश्यक असते, असे ते म्हणाले.


         या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उपप्राचार्य डॉ.सय्यद राज्जाक म्हणाले की, अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयटी क्षेत्रामध्ये नोकरी मिळवताना कुठलीही अडचण येऊ नये व योग्य मार्गदर्शनासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. 


           यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना   सारीका साळवे यांनी सांगितले की, प्रशांत दहिभाते हे स्विस एम.एन. सी.एस.साठी मॅन्युफॅक्चरिंग, बी.एफ.एस.आय.,आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कॉम्प्लेक्स इ.आर. पी., नॉन-इ.आर.पी, आणि क्लाउड आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन्सच्या देखरेखीमध्ये प्रभावी 25 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले एक प्रतिष्ठित वरिष्ठ व्यवस्थापन व्यावसायिक आहेत. 'चेंज द बिझनेस' नावाचे जागतिक आयटी परिवर्तन कार्यक्रम चालविण्यात त्यांचे कौशल्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. 


       या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  सारीका साळवे यांनी केले.  या कार्यक्रमास संगणक विभाग प्रमुख डॉक्टर रझाक सय्यद, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष डॉक्टर अभिजित कुलकर्णी,संगणक विभागातील सर्व शिक्षक आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.