Header Ads

Ahmednagar College: तरुणांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आर्दश घ्यावा- प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस

 Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचण प्रेरणा दिना निमित्ताने रक्तदान शिबीर 

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचण प्रेरणा दिना निमित्ताने रक्तदान शिबीरAhmednagar College:  अहमदनगर (प्रतिनिधी):  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक नाव जे केवळ भारतीय नागरिकांमध्येच नव्हे तर जगभरातील लोकांमध्ये प्रतिध्वनित होते. त्यांनी कर्मचारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि इतर अनेकांसाठी प्रेरणा आणि आदर्श म्हणून काम केले. आपल्या प्रेरक भाषणातून त्यांनी असंख्य तरुण आणि प्रौढांना प्रेरणा दिली आहे. त्यांची अनेक पुस्तके बेस्टसेलर ठरली, जिथे त्यांनी देशाविषयी आपली मते व्यक्त केली आणि तरुणांच्या मनात प्रज्वलित केले. अतिशय गरिबीतून डॉ. कलाम यांनी आपले विद्यार्थी जीवन जगले. तरुणांनी त्यांच्या जीवनाचा आर्दश घ्यावा,  असे प्रतिपादन प्राचार्य .डॉ.आर.जे. बार्नबस यांनी केले.

    भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त अहमदनगर महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागा आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विधमाने   रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, त्याप्रसंगी प्राचार्य .डॉ.आर. जे. बार्नबस बोलत होते.  यावेळी उपप्राचार्य प्रा.दिलीपकुमार भालसिंग, विनाअनुदान विभाग समन्वयक  प्रा. डॉ. सय्यद रज्जाक,  उपप्राचार्य प्रा. डॉ नोयल पारगे , उपप्रचार्य प्रो.प्रतिम कुमार बेदकर, राजिस्ट्रर पिटर चक्रनारायण उपस्थित होते.
 
           यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शरद बळे बोलताना म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाला आजारांना सामोरे जावे लागत आहे. रक्ताची ही तितकीच गरज आज आहे. तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे जेणेकरून रक्तदानामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचू शकतो तसेच गरीब गरजवंताना त्यांचा फायदा होतो, असे सांगून रक्तदानाविषयी विद्यार्थीनमध्ये असणारे गैरसमज दूर केले. ज्याचे वजन व हिमग्लोबीन कमी आहे त्यांना कोणत्या वेळी कोणता आहार घ्यावा यांविषयी मार्गदर्शन केले.  

       यावेळी 30 महाविद्यालयीन विद्यार्थींनी रक्तदान केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा . डॉ . भागवत परकाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ पोपट शिनारे  यांनी केले .

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ पवनजीत छाबडा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी  प्रा. डॉ . रविंद्र मते प्रा प्रबंधिका शेलार . कमवा शिका योजना विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच जनकल्याण रक्त पेठीचे अमिता तरटे ,जोशी मनिषा, चव्हाण सिस्टर , चंद्रकला फंड आणि किशोर यादव . यांनी परीश्रम घेतले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.