Header Ads

Ahmednagar Congress OBC: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे : संजय झिंजे

 Ahmednagar Congress OBC: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे : संजय झिंजे 

Ahmednagar Congress OBC: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे : संजय झिंजे


Ahmednagar Congress OBC: अहमदनगर (प्रतिनिधी): आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतरही मराठा आरक्षण दिला गेला नाही आणि त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलन चिघळत असल्याचे दिसत असून आंदोलक हे तीव्र भुमीका घेत आहेत.  


अनेक तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली असून सरकार तरीही ठोस पाऊल न उचलता फक्त बघ्याची भूमिका घेत लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने ओबीसीतुन आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी अहमदनगर ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी केली आहे आणि या आरक्षणास आमच्या ओबीसी अहमदनगर काँग्रेसचा जाहीर पाठींबा असल्याचे पत्रक जारी केले. 


गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजातील अनेक घटक आजही वंचित आहेत. 


यामुळे मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या भूमिकेला माझा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी केले आहे.

Maratha Aarakshan: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे संजय झिंजे यांची मागणी

 


झिंजे म्हणाले की, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सातवा दिवस सुरू आहे. त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बिघडलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाज बांधवांची मागणी मान्य करून सरकारने तात्काळ ओबीसीतून टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्याची घोषणा सरकारच्या वतीने करावी अशी मागणी झिंजे यांनी केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.