Header Ads

Ahmednagar Court: चेक न वटल्याबाबत आरोपीस शिक्षा व रु.3,85,000 देण्याचा आदेश

 Ahmednagar Court: चेक न वटल्याबाबत आरोपीस शिक्षा व रु.3,85,000 देण्याचा आदेश

Ahmednagar Court: चेक न वटल्याबाबत आरोपीस शिक्षा व रु.3,85,000 देण्याचा आदेश


    Ahmednagar Court:   अहमदनगर (प्रतिनिधी): फिर्यादी कपिल मदनलाल बोकरीया, रा.अहमदनगर यांनी जवळचा मित्र वैभव सतिष शिंगवी, रा.कडा, ता.आष्टी, जि.बीड यांना

 रुपये 3 लाख व्यवसायासाठी हातउसने दिले होते. सदर रकमेच्या परतफेडीपोटी आरोपी यांनी फिर्यादीस 

रक्कम रुपये 3 लाखाचा धनादेश दिला होता. सदरचा धनादेश अनादरीत झाल्याने फिर्यादीने सदर आरोपी 

विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्टचे कलम 138 प्रमाणे अहदनगर येथील

 मे.ज्युडिशिएल मॅजिस्ट्रेट साहेब, वर्ग 1 यांचे कोर्टात फौजदारी खटला दाखल केला होता.


     सदर खटल्यामध्ये आरोपीने अनेक बचाव घेतले होते. सदर खटल्यामध्ये मे. कोर्टासमोर आलेल्या 

पुराव्याची शहानिशा करुन आरोपीने घेतलेले बचाव अमान्य करुन मे. कोर्टाने आरोपीस 6 महिन्यांची

 सक्तमजुरीची शिक्षा तसेच  नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस रक्कम रु.3,85,000/- निकाल तारखेपासून

 एका महिन्यात द्यावी व सदर नुकसान भरपाईची रक्कम वेळेत फिर्यादीला न दिल्यास आणखी 

दीड महिने शिक्षा भोगण्याचा आदेश पारित केला आहे.

     फिर्यादीचे वतीने सदर खटल्याचे कामकाज अ‍ॅड.किशोर राऊत व अ‍ॅड. सौरभ राऊत यांनी पाहिले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.