Header Ads

Ahmednagar Court: धनादेशाचा अनादर झाल्याने आरोपीला पाच लाखांचा दंड

 Ahmednagar Court: धनादेशाचा अनादर झाल्याने आरोपीला पाच लाखांचा दंड

Ahmednagar Court: धनादेशाचा अनादर झाल्याने आरोपीला पाच लाखांचा दंड


     Ahmednagar Court: अहमदनगर (प्रतिनिधी)  - तक्रारदार रमेश शंभुराम चंदे यांनी माळीवाडा भागातील गोवर्धन अपार्टमेंटमधील फ्लॅट नं.27 ही मिळत अक्षय राजेंद्र गांधी यांना खरेदीखताद्वारे विक्री केली होती. फ्लॅटची मोबदला रक्कम म्हणून अक्षय गांधी यांनी दिलेला 28,50,000/- रुपयांचा धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादी फिर्यादी रमेश चंदे यांनी अक्षय गांधी याचे विरुद्ध अहमदनगर येथील मा.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात एस.सी.नं.5194/2019 अन्वये फौजदारी खटला दाखल केला होता.

     सदर खटल्याची सुनावणी होऊन न्याय निर्णय 4/10/2023 रोजी झाला असून, धनादेशाचा अनादर करणार्‍या अक्षय राजेंद्र गांधी याला न्यायालयाने 5,00,000/- रुपयांचा दंड व दंडाची रक्कम रु.33,50,000/- न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनविण्यात आली. तक्रारदार रमेश चंदे यांच्यावतीने अ‍ॅड.महेश सुरेश जोशी यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.