Header Ads

Ahmednagar Fort: मनुष्य पुरस्काराने नव्हे तर कार्याने व लोकांच्या प्रेमाने मोठा होतो : लक्ष्मीकांत तरोटे

 Ahmednagar Fort:  किल्ला मैदान हास्य क्लबच्यावतीने पी.एन.डफळ व कॅप्टन चौधरी यांचा सत्कार

Ahmednagar Fort: मनुष्य पुरस्काराने नव्हे तर कार्याने व लोकांच्या प्रेमाने मोठा होतो : लक्ष्मीकांत तरोटे    Ahmednagar Fort:   अहमदनगर (प्रतिनिधी)  मनुष्य पुरस्काराने मोठा होत नसून लोकांच्या प्रेमाने व कार्याने मोठा होत असतो. आपली मराठी साहित्य परंपरा मोठी असून, नगरमध्येही चांगले साहित्यीक, शास्त्रज्ञ, देशसेवा करणारे असून राज्यभर ते सुपरिचित आहेत. नगरमध्ये नुकतेच झालेले शब्दगंध साहित्य संमेलन नगरच्या साहित्य क्षेत्राला ऊर्जा देणारे आहे. 


या संमेलनात आमच्या हास्य क्लबचे सदस्य पी.एन.डफळ व देशाच्या सिमेचे रक्षण करत सेवा बजाविणारे कॅप्टन चौधरी यांच्या सावेडी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने केलेला सन्मान हा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन  किल्ला मैदान हास्य क्लबचे लक्ष्मीकांत तरोटे यांनी केले.


     किल्ला मैदान हास्य क्लबचे सदस्य पी.एन.डफळ यांना शब्दगंधचा पुरस्कार व कॅप्टन प्रभाकर चौधरी यांचा सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने सन्मान केल्याबद्दल क्लबच्यावतीने या दोघांचा सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी अर्जुनराव बकरे, लक्ष्मीकांत तरोटे, किशोर बोरा, श्रीमल फिरोदिया, वसंत बार्शिकर, प्रशांत गांधी, दत्तात्रय कुलथे, संजय खडके, नंदकुमार सोनी, तोरडमल काका, पंढरीनाथ सावंत, विवेक घटकांबळे, सुभाश भंडारी, सुरेश सिकची, चंपालाल भंडारी, गणीभाई शेख, रामचंद्र दिघे, रामचंद्र बेद्रे, कैलास ढोरे, दिपक अग्रवाल, अमृतलाल छल्लानी, सुरेश दरेकर, प्रशांत मुळे, रवि खिस्ती आदि उपस्थित होते.


     यावेळी  रामचंद्र दिघे यांनी प्रास्तविकात पी.एन.डफळ यांना शब्दगंध साहित्य संमेलनात ‘बाजीरावची सुटली दारु... आनंदी झाली पारु...’ या विनोदी कथेस व ‘महिलांचा सन्मान’ या कवितेस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तर कॅप्टन प्रभाकर चौधरी यांनी लष्करी सेवेत असतांना केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सावेडी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला होता. याबद्दल हास्य क्लबने त्यांचा सन्मान केला असल्याचे सांगितले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमल फिरोदिया यांनी केले तर दत्तात्रय कुलथे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.