Header Ads

Ahmednagar-Pune Railway: अहमदनगर-पुणे इंटरसिटीसाठी रेल्वेमंत्री ना.दानवे यांना सुदर्शन यांचे निवेदन

 Nivedan: अहमदनगर-पुणे इंटरसिटीसाठी रेल्वेमंत्री ना.दानवे यांना सुदर्शन यांचे निवेदन

Nivedan: अहमदनगर-पुणे इंटरसिटीसाठी रेल्वेमंत्री ना.दानवे यांना सुदर्शन यांचे निवेदन


     Ahmednagar-Pune Railway: अहमदनगर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शिर्डी दौर्‍यात रेल्वे मंत्री ना.रावसाहेब दानवे हे आले असता त्यांचे मुंबई सेंट्रल झोनचे झेडआययुसीसी सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी स्वागत करुन नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सह विविध मागण्यांचे निवेदन दिले. सदर निवेदन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाही ना.दानवे यांच्या मार्फत देण्यात आले. याप्रसंगी सोलापुर डिव्हीजनचे डिआरएम निरजकुमार डोहरेजी, सिएटीचे शिवराज मानसपुरे, आरआरटीएसचे एल.के.रणयेवले आदि उपस्थित होते.


     रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर ते पुणे हा प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. वाहतुकीच्या समस्यांमुळे हा प्रवास करणे अवघड होत आहे. 


अहमदनगर ते पुणे या मार्गावर रेल्वेने इंटरसिटी ट्रेन सुरु केल्यास प्रवाशांची वेळ आणि पैशांची मोठी बचत होईल, त्याचबरोबर रेल्वेसही चांगले उत्पन्न मिळू शकते. नगर-पुणे हे 120 कि.मी अंतर असून पुण्यास पोहचण्यास 4 तास इतका मोठा अवधी लागतो. रेल्वे सुरु झाल्यास 2 तास लागतील. सध्या नगर-पुणे महामार्गावर सुमारे राज्य सरकारी व खाजगी बसेसच्या सुमारे 300 फेर्‍या दररोज होतात. या बसेसचे 250 ते 350 रुपयांपर्यंत भाडे आहे.     यासर्व गोष्टींचा विचार करुन रेल्वे प्रशासनाने नगर-पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सुरु करावी. सकाळी 7 वाजता ही रेल्वे सुरु झाल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल. ही रेल्वे सुरु व्हावी, ही अनेक नगरकरांची अनेक वर्षांची मागणी असून, त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.      सदर मागण्यांबाबत विचार विनिमय करुन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ना.रावसाहेब दावने यांनी दिले. व निवेदनाची प्रती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाही दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.