Header Ads

Ahmednagar Sports: प्राची पवार ठरल्या अहमदनगरच्या पहिल्या लेडी आर्यन मॅन

 Ahmednagar Sports:  गोवा आर्यनमॅन स्पर्धेत अहमदनगर च्या खेळाडूंचे यश

Ahmednagar Sports:  गोवा आर्यनमॅन स्पर्धेत अहमदनगर च्या खेळाडूंचे यश


    

Ahmednagar Sports:  अहमदनगर (प्रतिनिधी):  गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आर्यन मॅन स्पर्धेत नगरच्या एस.पी.जे. स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत मेडल पटकाविले. यामध्ये प्राची पवार या अहमदनगरच्या पहिल्या लेडी आर्यन मॅन ठरल्या. तसेच रितेश खंडेवाल, सचिन राणे, सुनिल बनकर, श्रीकांत सावंत, वर्धमान सावंत, संस्कृती सावंत आदिंनी ही चांगली कामगिरी केली.


     आर्यन मॅन या स्पर्धेमध्ये 2 कि.मी.स्वीमिंग, 90 कि.मी. सायकलिंग व 21 कि.मी. रनिंग असे स्वरुप असते. यासाठी 8.30 तासांचा कालावधी असतो, परंतु नगरच्या स्पर्धांनी वेळेआधीच ही स्पर्धा पुर्ण करत गोवा आर्यन मॅन स्पर्धेत आपली वेगळीच छाप पाडली. या स्पर्धेत जगभरातील सुमारे 50 देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.


     यापुर्वीही एसपीजे स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी जगातील सर्वात अवघड 90 कि.मी.कॉम्रेड मॅरेथॉन, अहमदनगर ते स्टॅच्यु ऑफ युनिटी (गुजराथ) सायकलिंग अशा विविध स्पर्धेत सहभागी झाले होते.


     या सर्व यशस्वी खेळाडूंना एसपीजे स्पोर्टस् क्लबचे संदिप जोशी, गणेश कुलकर्णी (स्वीमिंग), रितेश खंडेलवाल  (सायकलिंग) यांचे मार्गदर्शन लाभले.  या सर्व यशस्वी खेळाडूंचे विविध स्तरातील अनेकांनी मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.