Header Ads

Ahmednagar Water Supply: अहमदनगरचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत ; पहा तुमच्या भागात कधी येणार पाणी

Ahmednagar Water Supply: अहमदनगरचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत ; पहा तुमच्या भागात कधी येणार पाणी 

Ahmednagar Water Supply: अहमदनगरचा पाणी पुरवठा दोन दिवस विस्कळीत ; पहा तुमच्या भागात कधी येणार पाणी


 Ahmednagar Water Supply: अहमदनगर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून 132 नगर एमआयडीसी विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ३३ केवी मुळा डॅम विद्युत वाहिनीवर शनिवारी ७ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे. तसेच शट डाऊन वेळेत अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंप हाऊस सब स्टेशन व मुख्य जलवाहिनी इत्यादी ठिकाणची महत्त्वाची दुरुस्तीची कामे शनिवारी हाती घेण्यात येणार आहे.  

शनिवारी 7/10/2023 रोजी बोल्हेगाव,नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रोड,पाईपलाईन रोड...पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

दरम्यानच्या काळात विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही त्यामुळे शनिवारी 7/10/2023 रोजी बोल्हेगाव,नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रोड,पाईपलाईन रोड,लक्ष्मी नगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर बुरुडगाव केडगाव नगर कल्याण रोड शिवाजीनगर इत्यादी भागास सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

 सदरचा पाणीपुरवठा हा रविवार आठ ऑक्टोबर 2013 रोजी करण्यात येईल

 तसेच रविवार 8 ऑक्टोबर 2023 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे लाल टाकी तोफखाना दिल्ली गेट सिद्धार्थ नगर चितळे रोड कापड बाजार मालेगाव ख्रिस्त गल्ली पाचपीर चावडी माळीवाडा बालिकाश्रम वसावे इत्यादी भागात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार 9 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात येईल

सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2013 रोजी होणारा पाणीपुरवठा झेंडीगेट मंगलगेट रामचंद्र खुंट  जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दाळ मंडई....

 सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2013 रोजी होणारा पाणीपुरवठा शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच झेंडीगेट मंगलगेट रामचंद्र कोट जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दाळ मंडई कालू बागवान गल्ली, कालू बागवान गल्ली धरती चौक बंगाल चौकी कोठी या भागात व गोलमाल रोड प्रोफेसर कॉलनी आगरकर मळा सिविल हडको प्रेमदान हडको टीव्ही सेंटर स्टेशन रोड आगरकर मळा विनायक नगर इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो 

मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल 

शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.