Header Ads

Chand Sultana High School: मुलांमधील क्षमता, कल ओळखून त्यादृष्टीने अभ्यासक्रम निवडला पाहिजे : सईद अहमद

Chand Sultana High School: ए.टी.यु. चाँद सुलतांना हायस्कूलच्यावतीने पालक व शिक्षकांसाठी मोटीव्हेशनल व्याख्यान संपन्न

Chand Sultana High School: मुलांमधील क्षमता, कल ओळखून त्यादृष्टीने अभ्यासक्रम निवडला पाहिजे : सईद अहमद


Chand Sultana High School: अहमदनगर (प्रतिनिधी) आज प्रत्येक पालक मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत आहे, बदलती शिक्षण पद्धती आणि त्यानंतर जॉबची शास्वती याबाबत अनेक शंका, वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एखाद्याला जास्तीचे पॅकेज मिळाले की, पालकांचाही त्या शाखेकडे कल वाढतो. परंतु आपल्या पाल्याची क्षमता आणि त्याची तयारी याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. 

यासाठी मुलांमधील क्षमता, कल ओळखून त्यादृष्टीने अभ्यासक्रम निवडला पाहिजे. इ. 8, 9 वी पासूनच पुढील ध्येय निश्चित करुन त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. मुलांवर जास्त दबाव न टाकता समन्वयातून त्याच्याकडून तयारी करुन घेतले पाहिजे. शिक्षकांनीही बदलत्या अभ्यासक्रमाचा स्विकार करुन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक, व्यवसायिक शिक्षणाबाबत माहिती द्यावी. विद्यार्थी हा मशिन नसून त्यांच्या भावनांचा विचार होणे आज गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय व्याख्याते सईद अहमद यांनी केले.

Chand Sultana High School: मुलांमधील क्षमता, कल ओळखून त्यादृष्टीने अभ्यासक्रम निवडला पाहिजे : सईद अहमदए.टी.यु. चाँद सुलतांना हायस्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक व शिक्षकांसाठी मोटीव्हेशनल व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय व्याख्याते सईद अहमद यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सय्यद मतीन, सचिव शेख तन्वीर, खजिनदार मौलाना शफीक, सदस्य सय्यद वहाब, नसीर अब्दुला, सय्यद सादिक, शेख गुलाम दस्तगीर, सय्यद मन्सूर, प्राचार्य समी शेख, मुख्याध्यापक नासीर खान आदि उपस्थित होते.

याप्रसंगी चेअमरन सय्यद मतीन म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे, नियमित अभ्यासबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांना महत्व प्राप्त होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांबाबत सजग राहणे महत्वाचे आहे. भविष्यातील संधी ओळखून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न संस्थेने केला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्तविक सचिव शेख तन्वीर यांनी केले तर सूत्रसंचालन सय्यद वहाब यांनी केले. शेवटी आभार मौलाना शफीक यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.