Header Ads

Dasra: विविध योजनांच्या माध्यमातून सभासदांचे हित साधले जात आहे : व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे

 Dasra: वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेत विजया दशमीनिमित्त पुजन

Dasra: विविध योजनांच्या माध्यमातून सभासदांचे हित साधले जात आहे : व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे    Dasra: अहमदनगर (प्रतिनिधी) वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेमध्ये विजयादशमी निमित्त संस्थेचे व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे यांनी सहकुटुंब विधिवत पूजा केली. याप्रसंगी संचालक सतीश भुजबळ, संतोष भिंगारदिवे, सचिन सुडके, शरद काकडे, व्यवस्थापक दिलीप घोडेचोर, लिपिक दीपक हुशारे आदी उपस्थित होते.


     याप्रसंगी व्हाईस चेअरमन आशिष वेळापुरे म्हणाले,  संस्था जिल्ह्यातील क्रमांक एकची बनवण्याचा सर्व संचालकांचा प्रयत्न आहे. 

 

सभासदांच्या गरजा जसे स्वतःचे घर बांधणी, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह तसेच आजारपणाच्या काळात विना विलंब कमीत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. 


सभासदांच्या मुला-मुलींचे विवाह प्रित्यर्थ ‘कन्यादान आहेर योजना’ तसेच सभासदास मुलगी झाल्यास ‘स्त्री जन्मास प्रोत्साहन’ म्हणून रोख रक्कम, वैयक्तिक वीस लाखांचा अपघात विमा अंतर्गत वीमा पॉलिसी उतरवण्यात आलेली आहे अशा योजनांच्या माध्यमातून सभासदांचे हित साधले जात आहे.


     पुढे बोलतांना श्री. वेळापुरे म्हणाले, संस्थेच्या भाग भांडवलात वाढ व्हावी म्हणून सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी ठेवीवर आकर्षक व्याज दिले जाते. त्यामुळे संस्थेकडील ठेवीमध्ये वाढ होऊन 31/03/2023  अखेर निरनिराळ्या ठेवीची एकूण रक्कम रुपये 10,55,39921 इतकी जमा आहे. 


मागील आर्थिक वर्षात आवश्यक त्या सर्व तरतुदी करून संस्थेला 1 कोटी 18 लाख 12 हजार 218 रुपये निव्वळ नफा झालेला आहे.  सभासदांना दहा टक्के लाभांश व व्याजावर दोन टक्के रिबेट देण्यात येत आहे. संस्थेची सुरक्षेतेच्या दृष्टीने सर्व विभागात आधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे.


 संस्थेतील सर्व कर्मचार्‍यांसाठी थम इम्प्रेशन मशीन बसवण्यात आले आहे. एकूणच नवीन संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कार्यामुळे पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले.


     याप्रसंगी तांत्रिक कामगार युनियनचे राज्य उपाध्यक्ष सतीश भुजबळ यांनी सर्व संचालक मंडळाच्या एकत्रित प्रयत्नाने सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांची उन्नत्ती साधली जात आहे.  यापुढेही संस्था अशीच प्रगतीपथावर राहील, अशी ग्वाही दिली.


     यावेळी दिलीप घोडेचोर यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन सुडके यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी  सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.