Header Ads

Dental Camp: दंत तपासणीने समस्यांचे निराकरण : माजी कुलगुरु निमसे

Dental Camp:  केडगांव येथील डेंटल स्पेस क्लिनिकच्या मोफत दंत रोग तपासणी शिबीरास प्रतिसाद

Dental Camp:  केडगांव येथील डेंटल स्पेस क्लिनिकच्या मोफत दंत रोग तपासणी शिबीरास प्रतिसाद   Dental Camp:  अहमदनगर (प्रतिनिधी)  आजच्या फास्टफूडच्या जमान्यात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही महत्वाची आहे. आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवल्यास अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. 


त्यात दातांचे दुखणे वेदनादायी असते. त्यासाठी वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे. आज डेंटल स्पेसच्यावतीने मोफत दंत तपासणी करुन केलेल्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये जागृती होईल व दातांच्या समस्यांचे निराकरण होईल, असे प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले.


     अंबिकानगर बस स्टॉप, केडगांव येथील डेंटल स्पेस क्लिनिकच्यावतीने आयोजित मोफत दंत रोग तपासणी शिबीराचे उद्घाटन माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संचालिका डॉ.प्रांजल गायकर-बर्वे, प्रा.बाळासाहेब गायकर, प्रा.रविंद्र बर्वे, इंजि.संतोष धुमाळ, उद्योजक सौरभ गायकर, पुष्कराज सुंबे, कौस्तुभ गायकर आदि उपस्थित होते.


     यावेळी डॉ.प्रांजल गायकर-बर्वे म्हणाल्या, आज विविध कारणांनी दातांच्या विकारामध्ये वाढ होत आहे. तसेच लहान वयातच मुलांमध्ये दातांच्या समस्या जास्त जाणवतात. त्याचप्रमाणे अनेक महिलाही दातांच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.  वेळीच उपचार केल्यास आपले दात निरोगी व मजबूत राहू शकतात. 


या मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून दातांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव काळात हे मोफत तपासणी शिबीर दि.23 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब गायकर यांनी केले तर आभार प्रा.रविंद्र बर्वे यांनी मानले. या शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.