Header Ads

Electrical Contractor: स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी संघटन महत्वाचे : वामन भुरे

 Electrical Contractor:  इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असो.ची रौप्य महोत्सवी सभा उत्साहात संपन्न

Electrical Contractor: स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी संघटन महत्वाचे : वामन भुरे     Electrical Contractor:  अहमदनगर (प्रतिनिधी): आज इलेक्ट्रीकल क्षेत्रात अनेक बदल होते आहे, या बदलांचा स्विकार करुन सेवा देणे हे क्रमप्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात आपणास टिकण्यासाठी संघटन हे महत्वाचे आहे. नगर शाखेच्यावतीने सभासदांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात ही कौतुकास्पद बाब आहे. 


आपल्या एकजुटीने अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत आहे. आजच्या वार्षिक सभेत सर्वांना सामावून घेत राबविलेले उपक्रम दिशादर्शक असेच आहे. असोसिएशनने आज रौप्य महोत्सव साजरा केला आहे, असेच कार्य यापुढील काळातही होऊन  ही असोसिएशन सुवर्ण महोत्सव नक्कीच आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करेल, असा विश्वास असोसिएशनचे राज्य अध्यक्ष वामन भुरे यांनी व्यक्त केला.     इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ अहमदनगर विभागाची 25 वी रौप्य महोत्सवी वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष वामन भुरे, महासिचव देवागं ठाकूर, उपाध्यक्ष उमेश रेखे, सचिन फडतरे (नाशिक), अमर पाटील (पुणे), बाबू मेहंदी (जळगांव),


 निलेश तिवरमकर (ठाणे), किरण पेंढारकर (धुळे), नगर विभागाचे माजी अध्यक्ष मनोहर शहाणे, नगर शाखेचे अध्यक्ष दत्ता झिंजुंर्डे आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.     याप्रसंगी अध्यक्ष दत्ता झिंजुर्डे म्हणाले, असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासदांच्या एकत्रित प्रयत्नाने असोसिएशन चांगले काम करत आहेत. सभासदांच्या अडचणी समाजवून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यापुढील काळातही असोसिएशन सभादांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या उन्नत्तीसाठी काम करेल, असे सांगितले.     हॉटेल संजोग येथे झालेल्या या वार्षिक सभे प्रसंगी इलेक्ट्रीक उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.  या प्रदर्शनात केईआय इंडस्ट्रीज, टू पॉवर अर्थिंग, आर.आर.काबेल, प्रथमेश ट्रान्सफार्मर, व्ही.के.आलोयज कंडक्टर, सुजित इंडस्ट्रीज, विशाल केबल, आयडियल इंजिनिअरिंग, गाला जॉईंट किट, 


रोटोप्लास्ट केबल, केंटर केबल, पॉवरटेक अर्थिंग, श्री इंजिनिअरिंग, सवेरा एलईडी, मेघा इंजिनिअरिंग, शिवचैतन्य सोलर, तिरुपती एंटरप्राईजेस या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनास शासकीय तंत्रनिकेतनचे श्री.हापसे व विद्यार्थी, तसेच अडसूळ कॉलेज, विखे पाटील कॉलेज, छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी भेट दिली.


     दुपारच्या सत्रात सौ.प्रिया उगले यांच्या नृत्यालयाच्या मुलींनी गणेश वंदना सादर केले. गायक संदिप भुसे यांच्या टीमने गाणी गायली. यावेळी कु.रुद्राणी गरुड, कु.सेजय तोरणे, कु.तनिष्का ससे यांनी नृत्य सादर केले. या वार्षिक सभेस नगर विभागाचे सुमारे दोनशे सभासद सहकुटूंब उपस्थित होते.


     यावेळी माजी राज्य अध्यक्ष सुनिल भुरे तसेच माजी संचालक बाळासाहेब आरडे व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच 1995 पुर्वीचे ज्येष्ठ सभासद यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सभासदांना रौप्य महोत्सवी भेट देण्यात आली. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार  करण्यात आला.


     यावेळी 2023-26 सलासाठी संचालक म्हणून श्रीकांत देवढे व राहुल सप्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सूत्रसंचालन अमित गरुड यांनी केले तर अमोल कोळकर यांनी आभार मानले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.