Header Ads

Kishor Kumar: जुनी गाणे युवा पिढीला आजही आकर्षित करतात: पवन नाईक

 Kishor Kumar: गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुपच्यावतीने किशोर कुमार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Kishor Kumar: जुनी गाणे युवा पिढीला आजही आकर्षित करतात: पवन नाईक


 Kishor Kumar: अहमदनगर (प्रतिनिधी) : जुन्या संगीत व गाणे हे आज परत होणे शक्यच नाही. नवीन गायक सुद्धा याच संगीत व गाण्यांचा अभ्यास करुन आपले भवितव्य उज्वल करत आहे. आजही रिमिक्स करुन जुन्याच धून व गाणे नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी वापरले जात असल्याचे प्रतिपादन सुफीसंत गायक पवन नाईक यांनी केले.

गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुपच्यावतीने स्वर्गीय गायक किशोर कुमार यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘ईक हसीना थी ’ या सुरेल गितांच्या कार्यक्रमाने त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलनप्रसंगी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुस भाई तांबटकर, एड. हनीफ बाबूजी, दादूभाई सुभेदार, तन्नु महाराज, एड. अमीन धारानी, आबीद खान आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संगीतप्रेमी सुहास भाई मुळे, इंजि. अभिजीत वाघ, कुलकर्णी मैडम,संतोष गुजर आदि मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना अमीन धाराणी म्हणाले, रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाच्या मानसिक ताण-तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी त्याला कुठे मानसिक तणाव कमी होऊन शांती मिळत असेल तर ते संगीत ऐकून. तेही जुने संगीत व गीते ऐकल्यास आजही सर्व पिढ्यातील मानव मंत्रमुग्ध होऊन शांती प्राप्त करतात व उत्साहीत होऊन तणाव विसरुन जातात, अशी जुन्या गाण्यांची जादू असल्याचे त्यांनी सांगितले. सुहास भाई मुळे यांनीही नवीन हौशी गायकांना भरपूर महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात किशोर कुमार यांचे आने वाला पल जाने वाला है...’ हे गीताने धमाकेदार सुरुवात करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर एड. गुलशन धाराणी, नरेश पेवाल, अभिजीत गायकवाड, डॉ. अविनाश मंचरकर, महेश धावटे, माधवी गुजर, चारू ससाने, सुनील वाघमारे, दीपा भालेराव, राज चोटीले, रामदास गव्हाणे, विकास पिटेकर, अर्जुन चौरे व इकबाल बागवान यांनी एकापेक्षा एक वरचढ अशा अनेक किशोर कुमार यांची सदाबहार गिते सादर करुन श्रद्धांजली कार्यक्रमात रंग भरले व रसिकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले व आभार एड. गुलशन धाराणी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.