Header Ads

Manoj Jarange: कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे ; तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका : जरांगे पाटील

Manoj Jarange: कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे ; तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका : जरांगे पाटील

Manoj Jarange: कोणताही नेता आपल्या दारात आला नाही पाहिजे ; तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका : जरांगे पाटीलManoj Jarange: जालना, 28 ऑक्टोबर 2023

 : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी  मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.


त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे 

त्यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते भावूक झाले. 

मला त्रास होत आहे. पोटात पाणी नसल्यानं अडचण येत आहे. पण माझ्या त्रासापेक्षा समाजाचा त्रास मोठा आहे,

त्यामुळे मी माझ्या त्रासाकडे लक्ष देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.


कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका

पुढे बोलताना ते म्हणाले की, कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. 

मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं, हे सरकारला माझं शेवटचं सांगणं आहे. 

संपूर्ण गावांनी उपोषणात सहभागी व्हावं. जीथे साखळी उपोषण सुरू आहे, 

तिथे अमरण उपोषण सुरू करा. उद्यापासून पाणी पेऊन उपोषणाला बसा, 

उद्यापासून हजारो लोक अमरण उपोषणाला बसतील.


 उपोषणात कोणाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी सरकारची

 असेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.


संपूर्ण गाव एकजुटीनं एकत्र या, उपोषणाला बसा. कोणताही नेता आपल्या 

दारात आला नाही पाहिजे. तुम्हीही कोणत्या नेत्याच्या दारात जाऊ नका, 

असं आवाहानही यावेळी मराठा समाजाला जरांगे पाटील यांच्याकडून 

करण्यात आलं आहे. आंदोलन शांततेत करा, कोणीही उग्र आंदोलन करू नका 

असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.