Header Ads

Miladunnabi: अहमदनगर शहराला सामाजिक एकतेची मोठी परंपरा : अति.पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे

Miladunnabi:  अहमदनगर शहराला सामाजिक एकतेची मोठी परंपरा-अति.पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे

Miladunnabi: अहमदनगर (प्रतिनिधी):  येथील सहारा फौंडेशन ट्रस्टच्या वतीने पैगंबर जयंती मिरवणूकीतील भाविकांना तेलीखुंट चौक येथे  पोलिस अधिकार्‍यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले.


     Miladunnabi: अहमदनगर (प्रतिनिधी):  येथील सहारा फौंडेशन ट्रस्टच्या वतीने पैगंबर जयंती मिरवणूकीतील भाविकांना तेलीखुंट चौक येथे  पोलिस अधिकार्‍यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले. 


याप्रसंगी अति.पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके, उपाधिक्षक अनिल कातकडे, ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक अजीम राजे, राजु जहागिरदार, अध्यक्ष लतीफ खान, उपाध्यक्ष  हुसैन, मोसिन सय्यद, इकराम शेख, शफी खान, समीर खान, नूर शेख, आरिफ पठान, आसिफ शेख आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी प्रशांत खैरे म्हणाले,  सहारा फाउंडेशन ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांतून समाजोन्नत्तीचे काम करत आहे. पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांना मिठाईचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. 


अहमदनगर शहराला सामाजिक एकतेची मोठी परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम दोन्ही समाज सर्वच सण एकत्रित साजरे करत असतात. यंदाच्या पैगंबर जयंती गणेश विसर्जन मिरवणुक एकत्रीत आल्यानंतरही समन्वयातून पैगंबर जयंती मिरवणुक दोन दिवसानंतर काढण्यात येवून सामाजिक ऐक्य दाखवून दिले आहे.


     याप्रसंगी अजीम राजे म्हणाले, गेल्या 19 वर्षांपासून सहारा फौंडेशनच्या ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात. यंदाच्या पैगंबर जयंतीनिमित्तही विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबविले जातील, असे सांगितले.


     मिरवणुकीत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल व सहारा फौंडेशनने राबविल्या उपक्रमाबद्दल पोलिस प्रशासनानेही फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.