Header Ads

Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन

  Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन

Navratra: हातमपुरा येथील काळूबाई मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त कुमारीका पूजन


      Navratra: अहमदनगर (प्रतिनिधी): शहरातील हातमपुरा येथील महाकाली काळूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून, अष्टमीला छोट्या कन्याच्या रुपाने स्वत: नवदुर्गा घरात आल्याचा आनंद परदेशी कुटूंबियांनी साजरा करत कुमारीका पुजन केले.


     प्रारंभी मंगलभक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. 10 वर्षाच्या आतिल कुमारिकांना नवदुर्गाचे रुप देण्यात आले. त्यांच्या दोन्ही पायांना अलता महावर लावण्यात आला. 


डोक्यावर लाल चुनरी, हळदी-कुंकुवाचा मान देत पाद्यपुजा करण्यात आली. यावेळी देवीच्या भक्त सौ.किरण परदेशी यांनी सर्व कुमारीकांना फराळ, शैक्षणिक शालेय साहित्य, दक्षिणा देऊन स्वागत केले.

     शहरातील महाकाली काळूबाईचे मंदिर पुरातन काळातले असून 110 वर्षांपासून परदेशी कुटूंबातील प्रत्येक पिढी सेवेत सज्ज आहे. भाविक नवरात्रा उत्सवात दर्शनासाठी गर्दी करतात. नवसाला पावणारी काळूबाई अशी महती आहे. घटस्थापनेपासून मंदिरात भजनसंध्या, आरती, प्रसादाचा कार्यक्रम होत आहे.


     अष्टमीनिमित्त योग योगेश्वर शंकर महाराज भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी शकुंतला परदेशी, मनिषा राणे, ऐश्वर्या कंठाळे, कल्याणी कंठाळे, सुनिता ससे, सुषमा कंठाळे, गायत्री परदेशी, संजना परदेशी आदिंसह कुमारिका व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.