Header Ads

Satkar: शैक्षणीक क्षेत्रात प्रा.शिरीष मोडक यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे -अ‍ॅड.अनंत फडणीस

  Satkar: शैक्षणीक क्षेत्रात प्रा.शिरीष मोडक यांचे कार्य दीपस्तंभा प्रमाणे-अ‍ॅड.अनंत फडणीस

     

Satkar: शैक्षणीक क्षेत्रात प्रा.शिरीष मोडक यांचे कार्य दीपस्तंभा प्रमाणे-अ‍ॅड.अनंत फडणीस

      

 Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी):  जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात प्रा.शिरीष मोडक यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांनी घडवलेल हजारो विद्यार्थी आज देश-परदेशात उच्चपदस्थ झाले आहेत. आजवर त्यांनी केलेल्या शिक्षण सेवेचा उचित सन्मान ‘जीवन गौरव पुरस्कार’ देवून शब्दगंध परिषदेने केला आहे. 


तसेच अनंत देसाई यांचेही समाजिक कार्य मोठे आहे. या कामाची दखल शहर भाजपाने घेवून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भविष्यात दोघांनाही अजून मोठे पुरस्कार व मोठमोठी पदे मिळो, अशा सदिच्छा हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ अनंत फडणीस यांनी केले.


      चितळे रोड जवळील पार्वतीबाई डहाणूकर कन्या शाळेच्या वतीने हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन अनंत देसाई यांची शहर भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड.अनंत फडणीस व शाळेचे चेअरमन प्रा.सुजित बेडेकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले. 


यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, मेहेर इंग्लीश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, भाईसथ्था नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी फळे, संस्थेचे सहायक सचिव बी.यू.कुलकर्णी आदींसह शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.


      प्रा.शिरीष मोडक म्हणाले, जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या हिंद सेवा मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी सर्व संचालकांचे बहुमोल सहकार्य मला होत आहे. जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वांनी केलेल्या अभिनंदनाच्या व सत्काराच्या वर्षावाने मी भारावून गेलो आहे. यापुढेही हिंद सेवा मंडळाच्या प्रगतीसाठी कायम झटणार आहे.


      कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापिका रोहिणी फळे यांनी प्रा.शिरीष मोडक व अनंत देसाई यांच्या कार्याचे कौतुक केले. अनघा देवचके यांनी सूत्रसंचालन केले, आभार सुखदेव नागरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.