Header Ads

Savedi- सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या सदस्यांनी घेतला धम्माल सहलीचा आनंद

 Savedi- सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या सदस्यांनी घेतला धम्माल सहलीचा आनंद


Savedi- सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्या सदस्यांनी घेतला धम्माल सहलीचा आनंद


   Savedi-  अहमदनगर (प्रतिनिधी):   खेळ, कला, क्रीडा, मनोजरंनाबरोबरच ज्येष्ठांचा अध्यात्मिक विकास व्हावा, या दृष्टीने मंच सहलीचे  आयोजन करत असते. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचच्यावतीने सराला बेट (पुणतांबा), हरिहरेश्वर, केशव गोविंद मंदिर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सांगितले.


     प्रारंभी नगरमधून निघून बेलापुर येथील केशव गोविंद बन,  कोपरगावं तालुक्यातील सराला बेट येथे गंगागिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, त्या स्थानाचे महत्व तसेच तेथील गोशाळा, प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालय, गुरुकुल, आरोग्य केंद्र आदि संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. त्यानंतर पुणतांबा येथील महान संत चांगदेव महाराजांची समाधीचे दर्शन घेत सहलीचा आनंद घेतला.


     या सहली दरम्यान ज्येष्ठांनी गाणे, भजने म्हणून सहलीचा आनंद लुटला. ढेपेबाईंनी दोन भारुउे गायली तर ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी विडंबन काव्य म्हणून सर्वांना हसविले. ज्योती केसकर, माधवी वेलवणकर, पुष्पा चितांबर, जाधव सर, खणकर सर यांनी गाण्यात सहभाग घेऊन सहलीचा आनंद द्विगुणित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यावर किशोर साळवी यांनी उत्तम काव्य केले.


     रेणुका ट्रॅव्हल्सचे शामराव क्षीरसागर यांनी ट्रॅव्हल, जेवण, नाष्टा याची उत्तम व्यवस्था केली. शरद कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार  मानले. सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात सहलीचा आनंद घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.