Header Ads

Snehasammelan: महिलांनी स्वत:तील क्षमता ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे : पद्मश्री निलिमा मिश्रा

 Snehasammelan: न्यू संकल्प ग्रुपचा वर्धापन दिन व‘स्मार्ट सखी’ ग्रुपचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमाने साजरे

Snehasammelan: न्यू संकल्प ग्रुपचा वर्धापन दिन व‘स्मार्ट सखी’ ग्रुपचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमाने साजरे     Snehasammelan: अहमदनगर (प्रतिनिधी):  आजची महिला नोकरी, व्यवसाय सांभाळून घर सांभाळत आहे, या दोन्ही जबाबदार्‍या पार पाडतांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे महिलांना स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यातून मानासिक, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे महिलांनी स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. आपल्यातील क्षमता ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे. 


नगरमधील न्यू संकल्प ग्रुप व स्मार्ट सखी ग्रुप महिलांना व्यासपीठ निर्माण करुन देत आहेत. या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास साधला जात असून, उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळत आहे. त्याचबरोबर ग्रुपच्या माध्यमातून दुर्लक्षित महिलांच्या उन्नत्तीसाठी काम करुन त्यांना आत्मनिर्भर बनवित आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन पद्मश्री  निलिमा मिश्रा (दिल्ली) यांनी केले.


Snehasammelan: महिलांनी स्वत:तील क्षमता ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे : पद्मश्री निलिमा मिश्रा     नगरमधील न्यू संकल्प ग्रुपचा 10 वा वर्धापन दिन व‘स्मार्ट सखी’ या ज्येेष्ठ महिला ग्रुपचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा माऊली सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून पद्मश्री  निलिमा मिश्रा (दिल्ली), गिनिस बुक रिकॉर्ड करणार्‍या पहिल्या महिला रिक्षा चालक शिला डावरे (पुणे) आदि उपस्थित होत्या. यावेळी डॉ.अंशु मुळे, सोनाली धूल, रिंकू फिरोदिया, वैशाली गांधी, सरोज कटारिया, मंगला जवाहर मुथा, सारिका मुथा, अर्पिता शिंगवी, शीतल गांधी, श्रद्धा देडगावकार, प्रिया मिटके व चारुता शिवकुमार अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


     यावेळी शिला डावरे म्हणाले, महिलांनी स्वत:तील क्षमता ओळखून काम केले पाहिजे, कोणतेही काम महिलांसाठी वर्ज नाही. जिद्द असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाने स्वत:चा वेगठा ठसा उमटवून शकतात. न्यू संकल्प ग्रुप अशा महिलांच्या मागे उभी आहे, याचा आनंद असल्याचे सांगितले.


     यावेळी 60 वर्षे वयोगटातील महिलांनी विविध कला प्रदर्शन केले. यामध्ये देव-देवी त्यांची भरतनाट्यम पूजा, विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा, मंगलागौर, भारुंड, साड़ी शो  आदि कार्यक्रमात पणती पासून पणजी पर्यन्त 4 पिढ्यांनी हा कार्यक्रम एकत्रित सादर केला. वैशाली चोपडा, मोनिका मेहता, स्मिता बोरा, मोनिका चानोदिया, मधु छाजेड यांनी व ग्रुप सदस्य मिळून हा कार्यक्रम सादर केला. तब्बल 500 महिलांच्या ग्रुप मध्ये 150 महिलांनी सहभाग घेऊन ‘एज इच जस्ट ए नंबर’ याची प्रचिती दाखवून दिली.


Snehasammelan: महिलांनी स्वत:तील क्षमता ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे : पद्मश्री निलिमा मिश्रा     यावेळी वैशाली चोपडा म्हणाल्या, गेली 10 वर्षे महिलांच्या सशक्तिकरण व सबलीकरणवर काम कार्यरत रहात दोन्ही ग्रुप दर महिन्याला विविध उपक्रमांद्वारे  महिलांचे सक्षमीकरण करत सामाजिक कार्य करत आहे. महिला या घरच्या नुसत्या लक्ष्मी नसून त्या परिवाराच्या पॉवर बँक आहेत तर न्यू संकल्प व स्मार्ट सखी ग्रुप त्यांचा पॉवर हाऊस आहे.  दर महिन्याला आनंदित होऊन, स्वतःला वेळ देऊन स्वत:चा सर्वांगिण विकास साधत आहेत. हा प्रवास असाच चालू ठेवत ग्रुप महिलांसाठी कार्यरत राहील, असे सांगितले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुति गांधी यांनी केले तर शकुंतला शेठिया यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.