Header Ads

Tamboli Jamat: हाजी शौकतभाई राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मजबूत करण्याचे काम करतील : जावेद तांबोली

 

Tamboli Jamat: हाजी शौकतभाई राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मजबूत करण्याचे काम करतील : जावेद तांबोली

Tamboli Jamat: अंजुमने इत्तेहाद तंबोली जमात च्यावतीने हाजी शौकतभाई तांबोली यांचा सत्कार

Tamboli Jamat: अहमदनगर (प्रतिनिधी):  गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींच्या प्रश्नांसाठी हाजी शौकतभाई तांबोली यांनी नेहमीच पुढाकार घेत सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून अनेकांना ओबीसी जातीचे दाखले, त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे आदि समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नत्तीसाठी ते नेहमीच कार्यरत राहीले आहे.

 त्याचबरोबर हज टुरच्या माध्यमातून देशभर त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून नेहमीच ओळखले जातात. आता त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून ते राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्याचे काम करतील, असे प्रतिपादन जावेद तांबोली यांनी केले.

अंजुमने इत्तेहाद तंबोली जमात अहमदनगर शहर च्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हाजी शौकतभाई तांबोली यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.युसूफ तांबोली, जावेद अब्बास तांबोली, शेख अकिल अहेमद, शफी तांबोली, माजी आ.दादाभाऊ कळमकर, अ‍ॅड.हनिफ बाबूजी, आय.बी.शाह आदि उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना हाजी शौकतभाई तांबोली म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करतांना अनेक लोक आपल्याशी जोडले जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांचे हक्क व न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण नेहमीच संघर्ष केला आहे. 

आता राष्ट्रवादी पक्षाने आपल्यावर जी प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. राष्ट्रवादी पक्षाचे कार्य जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम पदाच्या माध्यमातून केले जाईल. आज तंबोली जमातच्या वतीने आपला सत्कार करुन आपल्या कार्यास प्रोत्साहन दिले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी आ.दादाभाऊ कळमकर, प्रा.युसूफ तांबोली आदिंनी हाजी शौकतभाई तांबोली यांच्या कार्याचा गौरव करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.