Header Ads

Tulja Bhavani: अहमदनगरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये १५ रोजी घटस्थापना

 तुळजाभवानी मंदिरामध्ये १५ रोजी घटस्थापना 


            अहमदनगर-नवरात्रोत्सवास १५ सप्टेंबर पासून सुरु होत असून आहे. घराघरात मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना होणार आहे.दरवर्षी प्रमाणे हा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये रविवार दि १५ रोजी घटस्थापना दुपारी १२ होणार आहे 

                            मंदिराचे रंगकाम पूर्ण झाले असून मनपा मंदिर परीसराची साफ सफाई करून स्वच्छ करून १५ तारखेपर्यंत देणार आहे, मंदिरात सकाळी देवी मूर्तीस पंचामृताचा अभिषेक,दह्या- दूध व हळदी कूंकुवाने देवीला अंघोळ पलंगे कुटूंबियातील गयाबाई, पार्वतीबाई,शीतल,रोहिणी सविता या घालणार असून देवीला दागदागिने, अलंकार घालून नवीन साडी नेसवणार आहेत नंतर घटस्थापना गणेश व शीतल तसेच अनंत व रोहिणी या दांपत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे नंतर महाआरती होऊन दुपारी १ वा पासून भाविकांना दर्शन खुले राहणार आहे 

               मंदिर दर्शनासाठी दर्शन रांग पुढील बाजूने राहणार असून भाविक दर्शन करून मागील बाजूकडून म्हणजे सबजेल कडून बाहेर पडणार आहेत जेणेकरून गर्दी होणार नाही. तसेच रोज संध्या काळी ८ वा आरती होणार आहे तसेच दि १५ रोजी पलंगे कुटूंबियांची पलंगाचे संध्याकाळी मंदिरात आगमन होणार आहे त्या दिवशी मुक्कामी राहून दि १६ रोजी त्याचे प्रस्थान होणार आहे श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी नगरचे बाबुराव पलंगे,गणेश पलंगे,अनंत पलंगे,उमेश पलंगे यांच्यासह स्वयंसेवक यावर नियंत्रण ठेवणार आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.