Header Ads

Tulja Bhavani: तुळजाभवानी पलंगाचा प्रवास प्रेरणादायी आहे : पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे

Tulja Bhavani: जोशी परिवाराच्या वतीने पलंगाची  पूजा व महाआरती संपन्न 


    

Tulja Bhavani: जोशी परिवाराच्या वतीने पलंगाची  पूजा व महाआरती संपन्न

Tulja Bhavani: अहमदनगर (प्रतिनिधी): तुळजाभवानीच्या पलंगाचे भूईकोट किल्ला येथे जॊशी यांच्या घरी आगमन झाल्यावर बन्सीमहाराज मिठाईवाले जोशी परिवाराच्या वतीने पूजा व महाआरती करण्यात आली यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे व प्रियांका खैरे,अशोक जोशी,राजकुमार जोशीसंजय व साधना जोशी ,कौशल व नुपूर जोशी,गोविंद व आस्था जॊशी,गोपी जोशीकृष्णा जोशी,व मित्र परिवाराने पूजा व आरती केली.

 

        स्टेट बँक चौकातून वाद्याच्या गजरात पलंगाचे आगमन झाले यावेळी महिला भाविकांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला पूजेनंतर सर्वाना जलपान देण्यात आलेमोठ्या संख्नेने भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.

 

          पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे पूजेनंतर बोलताना म्हणाले पलंगाची पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटले व पलंगाचा प्रवास प्रेरणादायी उत्साह निर्माण करणारा आहे दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानक-यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही.


 पलंगपालखीबुधलीवालेभुतेमाया प्रतापबोंबले यासारखी मंडळी नगरपुणेनाशिकसोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही.


             पलंगाचा प्रवास  घोडेगावावरून वाजत-गाजत पलंगाचा प्रवास महिनाभर सुरू असतो. या दरम्यान तो जुन्नरनारायणगावआळेफाटापारनेरमार्गे नगरपर्यंत प्रवास करत असतो. व पुढे  चार  दिवस मुक्काम केल्यानंतर तिस-या माळेला तो नगरजवळील भिंगारच्या मंदिराकडे प्रस्थान करतो. याचवेळी  सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो. तेथून पुढे  जामखेडआष्टीभूमचिलवडीआपसिंगामार्गे दस-याच्या आदल्यादिवशी तुळजापुरात दाखल होतो. 


         अगदी पहाटेच्या सुमारास पलंग आणि पालखी तुळजाभवानी मंदिरात दाखल होतात. देवीचे सीमोल्लंघन हे दस-याच्या दुस-या दिवशी पहाटे सूर्याेदयाबरोबर होते,देवीची एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीतून उचलून देवीला पलंगावर झोपविण्यात येते. तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभा-यात ठेवण्यात येतो. तर पुढील पौर्णिमेपर्यंत म्हणजे ४ दिवस पलंगावर झोपल्यानंतर पुन्हा देवीजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर पौर्णिमेला पलंग तोडून तोही होमात टाकून नष्ट केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.