Header Ads

vadhuvarmelava: रविवारी बौद्ध वधू-वर मेळावा

 vadhuvarmelava: मंगल परिणय विवाह वधू-वर सुचक मंडळाच्यावतीने रविवारी बौद्ध वधू-वर मेळावा

vadhuvarmelava: मंगल परिणय विवाह वधू-वर सुचक मंडळाच्यावतीने रविवारी बौद्ध वधू-वर मेळावा



    vadhuvarmelava:  अहमदनगर (प्रतिनिधी): येथील मंगल परिणय विवाह वधू-वर सूचक मंडळाच्यावतीने रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा. चेतना लॉन्स, नगर-छत्रपती संभाजीनगर रोड, अहमदनगर येथे आयोजित केला आहे. 


या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून इंजि. किरण साळवे,  मनपा अधिकारी इंजि.परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, युनियनचे अनंत लोखंडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक भाऊसाहेब देठे यांनी दिली.


     संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाजातील विवाहेच्छूक वधू-वरांसाठी स्थळे मिळणे सोपे जावे तसेच सर्व बौद्ध समाज बांधव एकत्र यावे, या उद्देशाने या बौद्ध वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


तरी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी मो.9881531188 या क्रमांकावर संपर्क साधावा,  असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.