Header Ads

Ward No 2: खा.सुजय विखे यांच्या सहकार्याने रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

 Ward No 2:  निखिल वारे यांच्या प्रयत्नाने खा.सुजय विखे यांच्या सहकार्याने प्रभाग 2मधील सूर्यनगर परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

Ward No 2:  निखिल वारे यांच्या प्रयत्नाने खा.सुजय विखे यांच्या सहकार्याने प्रभाग 2मधील सूर्यनगर परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ


    Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी):  प्रभाग क्रमांक दोन हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असला तरी या भागातील अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नाने व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील सूर्यनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


     या कार्यक्रमास आ.संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेविका रुपाली वारे, पल्लवी जाधव, सभागृहनेते विनित पाउलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अविनाश घुले, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, सुभाष तळेकर,


 आर.बी.कासार, शशिकांत महामुनी, बी.एस.दंडवते, प्रथमेश कुलकर्णी, सचिन गाडे, एकनाथ खिलारी, ज्योती तवले, शितल गावडे, निता चपळे, सुवर्णा फुंदे, छाया बारगजे, मीना सावंत, दिपा निमसे, सुनिता गडाख, संगिता गीते, सुषमा कापसे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     प्रास्तविकात माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले, त्यांचा विश्वास विकास कामे करुन सार्थ करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रभाग मोठा असला तरी स्थानिक निधी, आमदार निधी बरोबरच खा.डॉ.सुजय विखे यांच्याकडे सूर्यनगरच्या रस्त्यासाठी पाठपुरावा केल्याने प्रयत्नांना यश मिळाले. 


खा.विखे यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला व आज रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ होत आहे. खा.सुजय विखे, आ.संग्राम जगताप यांनी निधी दिल्याने विकास कामे मार्गी लागत आहे, असे सांगितले.


     खा.विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, नगर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आ.संग्राम जगताप, खासदार म्हणून मी केंद्र शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करतो. प्रभाग दोनचे चारही नगरसेवक कार्यतत्पर आहेत.


 निखिल वारे तर एखादा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे आले तर तो पूर्ण सुटेपर्यंत पाठपुरावा करतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे आज सूर्यनगरच्या नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न आता सुटला आहे, असे त्यांनी सांगितले.


     आ.संग्राम जगताप यांनी देखील विकास कामांसाठी प्रभाग दोनचे चार नगरसेवक एक साथ काम करतात. विकास कामांच्या माध्यमातून आदर्श प्रभाग म्हणून वेगळी ओळख ते करुन देतात. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आमच्याकडे येतात, त्यामुळे मी व खा.विखे साहेब तुम्हाला विकास कामांसाठी  कधीच निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले.


     सूर्यनगरच्या नागरिकांनी खा.सुजय विखे, आ.संग्राम जगताप, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे या सर्वांचा सत्कार करुन आभार मानले. यावेळी सावंत सर, मेजर सोनवणे, फुंदे मेजर, गायकवाड सर, गीते बाबा, अ‍ॅड.वडावकर, खेडकर साहेब, दानवे सर, गडाख साहेब आदिंसह नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.