Header Ads

Ward No 2: अभ्यासू लोकप्रतिनिधी काय करु शकतो हे कामांमधून खा.डॉ.सुजय विखे यांनी दाखवून दिले - निखिल वारे

 

Ward No 2:  लक्ष्मीनगरमधील बंद गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ


Ward No 2:  लक्ष्मीनगरमधील बंद गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ
     Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी): माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र.2 मधील लक्ष्मीनगर येथील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ निखिल वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलतांना श्री.वारे म्हणाले, खा.डॉ.सुजय विखे यांनी नगरकरांच्या मुलभूत अडचणी मध्ये लक्ष घालून विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला.


 त्यामुळे आम्हा नगरसेवकांना प्रभागात विकास कामे करणे सोयीचे झाले. शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न, बाह्यवळण रस्ता, महसूल भवन, आयुष हॉस्पिटल, भिंगार कॅन्टों.बोर्ड अशा महत्वाच्या प्रश्नात लक्ष घालून ती सोडविली. अभ्यासू लोकप्रतिनिधी काय करु शकतो, हे विकास कामांमधून खा.डॉ.सुजय विखे यांनी दाखवून दिले. प्रभागात कामे करतांना माझे सहकारी नगरसेवक यांचे सहकार्य असते, असे श्री. वारे यांनी स्पष्ट केले.


     प्रभाग 2 मधील लक्ष्मीनगर येथील खेडकर घर ते वांढेकर घरापर्यंत, शेटे घर ते लक्ष्मी माता मंदिरापर्यंतच्या बंद गटार पाईप योजनेचा शुभारंभ माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी सभागृह नेते विनित पाउलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार, सुर्यकांत झेंडे, राजेंद्र शेटे, अनिल गाडे, एकनाथ खिलारी, राजेंद्र दहातोंडे, विश्वनाथ शिंदे, शिवनाथ खेडकर, गजानन जाधव, सुधाकर लबडे, उत्तम काळे, विकास गुमास्ते, भाऊसाहेब दळवी, दत्तात्रय पोंदे, भानुदास दातीर, प्रशांत कदम, गोदावरी कराळे, उषाताई दळवी, रेश्मा देवकाते, शांताबाई लबडे, मंदाताई झेंडे, सुभद्रा कदम आदिंसह नागरिक उपस्थित होते.


     श्री.वारे पुढे म्हणाले, विकास कामे करतांना आम्ही फक्त कामाला महत्व देतो. आ.संग्राम जगताप, खा.डॉ.सुजय विखे यांनी विविध योजनांमधून शहरासह उपनगरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, उपनगरातील अंतर्गत रस्त्यांची कामे झाली ही नगरकरांसाठी खूप मोठी समाधानाची बाब आहे.


     सूर्यकांत झेंडे म्हणाले, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नामुळे व खा.सुजय विखे यांच्या सहकार्याने आमचा लक्ष्मीनगर मधील ड्रेनेज, रस्ते कामाचा प्रश्न आता सुटला आहे. आम्ही कामे सांगण्यापुर्वी प्रभाग दोनचे चार नगरसेवक स्वत: पुढाकार घेऊन पाठपुरावा करुन प्रश्न सोडवितात. त्यामुळे भविष्यात आम्हाला तक्रार करण्याची वेळ येणार नाही, असे ते म्हणाले.


     यावेळी विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार यांनी आपल्या मनोगतामधून सर्वांच्या सहकार्याने प्रभागाचा विकास आम्ही करत आहोत, असे सांगितले.


     ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल देवन शेटे, मधुकर लबडे, राहुल खाबीया, कुणाल भराट, यादव सदाफुले, भाऊसाहेब आडोळे, अभिषेक खिलारी यांनी या सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.