Header Ads

World Mental Health Day: विश्व मानसिक आरोग्य दिना निमित्तानं दृक श्राव्य कार्यक्रम इक बंजारा गाये

 World Mental Health Day: विश्व मानसिक आरोग्य दिना निमित्तानं दृक श्राव्य कार्यक्रम इक बंजारा गाये..

World Mental Health Day: विश्व मानसिक आरोग्य दिना निमित्तानं दृक श्राव्य कार्यक्रम इक बंजारा गाये World Mental Health Day:  अहमदनगर (प्रतिनिधी)  :  विश्व मानसिक आरोग्य दिवस प्रित्यर्थ आनंद क्रियेशन तर्फे नगर शहरातील रहमत सुलतान हॉलमध्ये बुधवार 11 अक्टोबर 23 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता 'इक बंजारा गाये जीवन के गीत सूनाये' हा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. 

ताण-तणावातून आनंदाकडे नेणारी गाणी या शीर्षकाखाली विविध ताण-तणाव अवस्थेतून समुपदेशन करून आनंदाकडे नेणारी हिंदी चित्रपट गीते विवेचन करीत सादर करण्यात येणार आहेत. फलटण येथे 2006 सालापासून गीत गुंजन श्रोता संघाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सुवर्णकाळातील संगीतावर दृक श्राव्य कार्यक्रम तयार करून सादर करणारे श्रीयुत उस्मान शेख (निवृत्त अधीक्षक अभियंता MSEB)हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

आता पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या संगीतकार, गायक यांच्या गीतावर आधारित 28 दृक श्राव्य कार्यक्रम तयार करून फलटण, सातारा, पुणे सोलापूर, अमरावती येथे सादर केलेले आहेत. यापूर्वी नगरवासीयांसाठी उस्मान शेख यांनी व्हॅलेंटाईन्स ऑफ गोल्डन इरा या सुवर्ण काळातील प्रेम कथा वर आधारित कार्यक्रम सादर केलेला आहे.


भावनिक किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झगडणारया प्रत्येक मनुष्याला अस्वस्थ वाटत असल्यास तणावमुक्त कसे व्हावे? यासाठी प्रथमच नगरमध्ये एक आगळा वेगळा रसिकांना प्रबोधन व मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

 अशी विनंती आयोजक नंदकिशोर आढाव व दिलीप अकोलकरानी केली आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक प्रांजली पेस्ट कंट्रोल सर्व्हिस व आर.जे. असोसिएटेस तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश सर्वांना मोफत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.