Header Ads

Ahmednagar BJP: नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - अ‍ॅड.अभय आगरकर

Ahmednagar BJP:  प्रभाग 1 व 2 मधील प्रमुख पदाधिकारी, सुपर वारीयर यांची बैठक  संपन्न

Ahmednagar BJP:  प्रभाग 1 व 2 मधील प्रमुख पदाधिकारी, सुपर वारीयर यांची बैठक  संपन्न


   Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) - गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली आहे. जागतिक पातळीवर भारताचे वाढत असलेला प्रभाव हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. अशीच घोडदौड राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नियोजनाखाली सुरु आहे. 


भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्यातील सरकारने सर्वसामान्यांसह सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधला आहे. या योजनांचा लाभ अनेकांना होत असल्याने अनेक लोक भाजपाशी जोडले जात आहेत. येणार्‍या निवडणुकीत पुन्हा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे.


 त्यासाठी पदाधिकारी, बुथ प्रमुख, सुपर वारियर्स यांनी लोकांपर्यंत पोहचून केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन पक्षाची ध्येय-धोरणे तळगाळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. नगरमध्ये भाजपा पक्षाला चांगले वातावरण असून, येणार्‍या सर्वच निवडणुकीत भाजपाला नंबर एकच पक्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन भाजपाचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.


     प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील प्रमुख पदाधिकारी, सुपर वारीयर यांची बैठक  शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, लोकसभा निवडणूक प्रमुख माजी महापौर बाबासाहेब वाकळे,  विधानसभा प्रमुख  भैय्या गंधे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली. 


यावेळी सरचिटणीस सचिन पारखी, सावेडी मंडल अध्यक्ष  नितीन शेलार, विधानसभा विस्तारक सागर भोपे, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, नगरसेवक रामदास आंधळे, चिटणीस महेश तवले, विशाल नाकाडे, उपाध्यक्ष अनिल ढवण, कैलास गर्जे, उपाध्यक्ष तुषार पोटे, निशांत दातीर, रवी गुडा, संपत नलावडे , सुमित बटूळे, साहिल शेख, विष्णू तवले, प्रवीण चुटके आदी  उपस्थित होते.


     याप्रसंगी बाबासाहेब वाकळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ संबंधितापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, त्याच प्रमाणे ज्यांनी या योजनेंतून प्रगती साधली अशा लोकांचा प्रतिक्रिया जनसामान्यापर्यंत पोहचवाव्यात. 


नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे खा.डॉ.सुजय विखे यांनी नगरमध्ये केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात रहावे, असे आवाहन केले.


     यावेळी भैय्या गंधे यांनी नगर शहरात भाजपा पक्षाला चांगले वातावरण असून, प्रत्येक भागात नागरिकांसह युवक हे भाजपाशी जोडले जात आहेत. युवकांच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काम करावे. प्रत्येक प्रभाग निहाय बैठका आयोजि करण्यात येत असून, यात जास्तीत जास्त पदाधिकार्‍यांना सहभागी करुन घ्यावे, अशा सूचना  दिल्या.


     सूत्रसंचालन सचिन पारखी यांनी केले तर आभार नितीन शेलार यांनी मानले. यावेळी प्रभाग 1 व 2 मधील भाजपाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.