Header Ads

Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा- अ‍ॅड.अभय आगरकर

  Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा- अ‍ॅड.अभय आगरकर


Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा- अ‍ॅड.अभय आगरकर


    Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) - गेल्या महिन्या भरापासून  अहमदनगर शहरात अघोषित भारनियमन सुरु आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने घरगुती तसेच व्यवसायिकांना वीजे अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. याबाबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नगर शहर श्री.लहामगे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.


     यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, गेल्या महिन्यापासून  अहमदनगर शहरात भारनियमन नाही, असे वीज वितरण कंपनीच्यावतीने सांगितले जाते. परंतु दिवसभरातून अनेकवेळा लाईट जाते, त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीने तातडीने उपाय योजना राबविण्याची गरज आहे. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिला आहे.


     यावेळी अधिकार्‍यांनीही सध्या भारनियमन नाही, असे सांगून परंतु दिवाळी सणामुळे वीजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे अनेक भागात अचानक बिघाड होऊन लाईट जात आहे. तसेच किरकोळ स्वरुपाच्या पावसामुळेही वीज वितरणात व्यत्यय येत आहे. 

याबाबत उपलब्ध कर्मचार्‍यांकडून तातडीने उपाय योजना राबवून वीज पुरवठा लवकर लवकर सुरु करण्यात येत आहे. यापुढील काळातही वीज पुरवठा सुरळीत राहील, याची काळजी घेऊ, असे आश्वस्त केले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.