Ahmednagar BJP: भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या वतीने विविध मागणीचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांना निवेदन

Darshak
0


Ahmednagar BJP:  पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद


Ahmednagar BJP:  पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद



     Ahmednagar BJP:  अहमदनगर (प्रतिनिधी)  -  येथील जुने कलेक्टर ऑफीसमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे उपस्थितीत  आयोजित जनता दरबारात भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष फरीदा अब्दुल लतीफ शेख, नुरबानो कुरेशी, शबाना शेख, सबीया शेख, अमरीन एजाज शेख, जास्मीन जाकीर शेख यांनी अल्पसंख्याकांच्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ , पोलीस अधीक्षक राकेश ओला, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे आदी उपस्थित होते.


        या निवेदनामधे उज्वला गॅस योजनामधून अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील महिलांना गॅस वाटप करण्यात यावे तसेच विधवा महिलांसाठी तत्काल शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, घरकुल योजनेत अल्पसंख्याक मुस्लिम महिलांना प्राधान्याने घरे देण्यात यावी. गृह उद्योगासाठी मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात यावे, कमीत कमी कागदपत्रे आणि विना जामीनदार कर्ज वाटप करण्यात यावे आदिंचे निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली.


        पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असुन सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी सबका साथ सबका विकास या ब्रिद वाक्या प्रमाणे त्यांना अल्पसंख्याक समाजाने ही मतदान केलेले असून आगामी निवडणुकामध्येही अल्पसंख्याक समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्राधान्य देणार असून अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष फरीदा शेख यांनी सांगितले.


     भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, भाजप जेष्ठ नेते सुनील रामदासी, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अल्पसंख्याक समाजातील महिलांचे संघटन होत असून लवकरात लवकर अल्पसंख्याक महिलांचे प्रश्न मार्गी लागल्यास समाजात चांगला संदेश जाऊन समाज भाजप बरोबर जोडला जाईल, असे महिला अल्पसंख्याक आघाडी च्या प्रमुख फरीदा शेख यांनी सांगितले.


        अल्पसंख्याक समाजाच्या मुलभुत सोयी-सुविधासाठी, सदर निवेदनावर योग्य विचार करुन, पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे जिल्ह्याचे पालकमंत्री, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top