Header Ads

Ahmednagar Congress: झेंडीगेट येथील धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवक रियाझ सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

काँगेस मध्ये ईनकमिंग सुरुच...

Ahmednagar Congress: झेंडीगेट येथील धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवक रियाझ सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): काँगेसमध्ये ईनकमिंगचा सिलसिला सुरुच आहे. प्रभाग १० मधील सामाजिक कार्यकर्ते रियाझ सय्यद ख्वाजा यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहर विकासाचे व्हिजन केवळ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा संविधानाचा विचार आहे. म्हणूनच मी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेसला मजबूत करण्याचे काम आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन सय्यद यांनी प्रवेशानंतर बोलताना केले आहे. 


शहर जिल्हा काँग्रेसच्या शिवनेरी पक्ष कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी काळे यांच्या हस्ते सय्यद यांच्यासह कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी जाकीर सय्यद, जाफर पठाण, राकेश जगताप, जावेद सय्यद, नंदकुमार पठारे, आयुब बाबा बागवान आदींसह अनेकांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. साफसफाई कामगार काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 


यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा,अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, कॉंग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, गणेश चव्हाण, चंद्रकांत उजागरे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा खान, विद्यार्थी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, फिरोज युसुफ खान, प्रा. बाबुलाल शफी शेख डॉ. जमीर शेख, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे आदी यावेळी उपस्थित होते. 


सय्यद हे प्रभाग १० मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी आजवर अनेक वेळा आवाज उठविला आहे. अनिस चुडीवाला म्हणाले, शहराची अवस्था बकाल झाली आहे. शहर विकसित झाले पाहिजे ही जनभावना आहे. विकासाचे व्हिजन हे केवळ काँग्रेसकडे आहे. म्हणूनच काँग्रेसमध्ये सातत्याने वेगवेगळ्या समाजातील घटकांचे इनकमिंग सुरू आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काँग्रेस बळकट होत आहे. अजूनही अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेशासाठी इच्छुक आहेत. लवकरच त्यांचे देखील पक्ष प्रवेश पार पडतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.