Header Ads

Ahmednagar Fataka Association: कल्याण रोडवरील होलसेल फटाका मार्केट मध्ये अग्निशामकचे प्रात्यक्षिके

 Ahmednagar Fataka Association: कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट मध्ये अग्निशामक चे प्रात्यक्षिके

Ahmednagar Fataka Association:  कल्याण रोड वरील होलसेल फटाका मार्केट मध्ये अग्निशामक चे प्रात्यक्षिके

 


Ahmednagar Fataka Association: अहमदनगर (प्रतिनिधी) - दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने नगर कल्याण रोड वर होलसेल फटाका मार्केट सुरु झाले असून या ठिकाणी अशोक सेवा सर्व्हिस चे संचालक अशोक तोडमल यांनी अग्निशमक ची प्रात्यक्षिके दाखवली अशी माहिती फटाका असोसिएशन चे सचिव श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.

या वेळी अशोक तोडमल यांनी अग्निशमन ची माहिती देतांना सांगितले की, फटाका हा ज्वलनशील पदार्थ असून अचानक जर आग लागली तर आपण कशापद्धतीने आग विझवावी या बाबत माहिती सांगून प्रात्यक्षिके ही दाखवली.

या वेळी फटाका असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी अशोक सेवा सर्व्हिस चे संचालक अशोक तोडमल यांचे आभार मानले. या वेळी असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य विकास पटवेकर, साहेबराव गारकर, देविदास ढवळे, शिवराम भगत, संजय जंजाळे, अरविंद साठे, संजय सुराणा, अमोल तोडकर, सतीश दारकुंडे, मयूर भापकर, देविदास ढवळे व संभाजी कराळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.