Ahmednagar ST Bus: अहमदनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या लालपरी हाऊसफुल ; खासगी वाहनांची लुटालूट

Darshak
0

   Ahmednagar ST Bus: अहमदनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या लालपरी हाऊसफुल ; खासगी वाहनांची लुटालूट

 

Ahmednagar ST Bus: अहमदनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या लालपरी हाऊसफुल ; खासगी वाहनांची लुटालूट (Photo Adil Shaikh Ahmednagar)


        Ahmednagar ST Bus:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : दिवाळी सुट्टीचा रविवार शेवटचा दिवस आणि क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असल्याने अनेक नगरी प्रवाशांनी गर्दी कमी असेल असा विचार करून तारकपूर बस स्थानक गाठले सर्वजण याच विचाराने पुण्यासाठी येथे आले आणि एकच गर्दी जमली. 


सर्वच्या सर्व बसेस त्यात लालपरीनेही भाव खाल्ला आणि शिवशाही आणि शिवनेरी तसेच निमआरामही हाउसफुल झाल्या तसेच अनेक नगरकरांनी उभे राहून प्रवास केला तर अनेक प्रवाशी पुन्हा घरी परतले.


Ahmednagar ST Bus: अहमदनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या लालपरी हाऊसफुल ; खासगी वाहनांची लुटालूट (photo Adil Shaikh Ahmednagar)


 यात खासगी वाहतुकीनेही संधीचे सोने करणे अजिबात सोडले नाही त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने सोने  आणि सर्वात कमी ४०० रुपये प्रति प्रवाशी भाडे तुम्हाला यायचे तर या आणि दहा सीट असून द्या या भाषेत खासगी वाहतूक करणार्यांनी भाडे आकारले आणि काही खासगी वाहनांनी ६०० रुपया पर्यंतहि भाडे घेतले. एकीकडे महामंडळाच्या बसेस फुल आणि दुसरीकडे खासगी वाहनांची लुटालूट.


ज्यांना आज अत्यावश्यक आणि पुण्याला जाणे अनिवार्य होते असे नगरकर दुसरा काही मार्ग नाही त्यामुळे असे लुटणारे भाडे देऊन पुण्याला गेले.ज्यांना एवढे लुटारू भाडे देणे शक्य नव्हते ते आपल्या घरी परतले. 

बस संख्या वाढविली जाते परंतु आवश्यकतेनुसार व गरजेनुसार त्यात वाढ तात्काळ करणे आवश्यक आहे आणि म्हणून प्रवाशांचे हल्ली थांबतील आणि खासगी वाहतूक करणारे हि अतिरिक्त वाढीव भाडे आकारणार नाही 

प्रवाशांच्या अधिक संख्या आणि गर्दी पाहून एसटी महामंडळानेही बसेस वाढविणे गरजेचे असून यामुळे जनसामान्य प्रवाशाचे हाल थांबतील आणि लूटही थांबेल. एसटी महामंडळ उत्पन्न या सुट्टीच्या सीझनमध्येच वाढते त्यामुळे त्यांनी अधिकच्या जादा बसेस या कार्यकाळात वाढविणे अत्यावश्यक आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top