Header Ads

Arangao Kirtan: होय ! बिदागी न घेता उलट ते देवून जातात

 

Arangao Kirtan: अरणगाव येथे किर्तन दादा महाराज फुंदे यांचे किर्तन

Arangao Kirtan: अरणगाव येथे किर्तन दादा महाराज फुंदे यांचे किर्तन


   Arangao Kirtan: अहमदनगर (प्रतिनिधी)  - परमार्थाची खरी शिकवण समाजात पोहचवण्याच काम शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोठ नावलौकिक असलेले दादा महाराज फुंदे हे किर्तनाची बिदागी  न घेता उलट त्या गावातील एखाद्या अनाथ लेकराच्या शिक्षणाला किंवा विधवा भगिनीच्या उदरनिर्वाहासाठी पाच हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देवून जातात. 

इतकच नाही तर गळ्यात हार घालून घेत नाही अन विशेष म्हणजे जेथे किर्तन करावे तेथे अन्न न सेवावे या तुकोबारायांच्या अभंगाचं पालन करत आपला जेवणाचा डबा स्वतः घेवून जातात. काल अरणगाव ता.नगर येथे बुवाजीबुवा यांचा समाधी सोहळा सप्ताह निमित्त झालेल्या किर्तनसेवेत महाराजांच्या आदर्शवत सत्कार्याचं दर्शन घडलं.


     याप्रसंगी रमेश आजबे, बाळूमामा शिंदे, बाबा शिंदे, छगन शिंदे, सुजित कोके, राजू कोतकर यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.


     आपुलिया हिता जो असे जागता या अभंगावर अध्यात्मिक विवेचनासोबत किर्तनात शेवटी कुटुंब व्यवस्था नातं जपणे आईवडिलांची सेवा यासह सामाजिक बांधिलकीवर परिणामकारक असं समाजप्रबोधन करण्याचं मौल्यिक काम दादा महाराज करत आहेत.


     दादा महाराजांची पत्नी मोहटादेवी ट्रस्टच्या विश्वस्त अनुराधा केदार-फुंदे हे दोघेही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत आपला एक जणाचा  पगार संसाराला अन एक समाजातील दीनदुबळ्यांना खर्च करत त्यांनी आजवर अनेक वंचित गरजू निराश्रित निराधारांना अन्न वस्त्र पुरवणे तसेच अनाथ अन एकल पालकाची बालके यांच्या शिक्षणासाठी मदत यासह विधवा भगिनींच्या उदरनिर्वाहासाठी शेळ्या शिलाई मशीन पिठाची गिरणी छोटे व्यवसाय सुरु करण्यास मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत.


     बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या संतोक्तीनुसार दादा महाराजांच्या कार्याचं सर्वच स्तरातून मोठं कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.