Header Ads

Bahadurshah Zafar: बहादूर शाहांच्या कबरीवर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली- आबीद खान Bahadurshah Zafar: बहादूर शाहांच्या कबरीवर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली- आबीद खान


Bahadurshah Zafar: बहादूर शाहांच्या कबरीवर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली- आबीद खान Bahadurshah Zafar:  अहमदनगर - इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढणार्‍या व काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या मुगल साम्राज्याचे शेवटचे राजे बहादूर शाह जफर यांच्या कबरीवर शपथ घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व इंग्रजां विरुद्ध रणशिंग फुंकले असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी केले.

मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी व अरुणा आसिफअली शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्यावतीने स्वातंत्रता सेनानी बहादूर शाह जफर व शहीद अशफाकुलाह खान यांच्या जयंतीनिमित्त मुकुंदनगर येथील मातोश्री उर्दू प्राथमिक शाळा व मासुमिया डीएलएड कॉलेज मध्ये स्वतंत्रता सेनानी बहादुर शाह जफर व शहिद अशफाकुलाह खान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर, अरुणा आसिफ अली शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळ अहमदनगर चे अध्यक्षा सय्यद फरीदा गफार, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हे खान, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, प्राध्यापिका जबीन सय्यद, सदफबाजी, असलम पटेल, शेख शाहीन,शेख फरजाना,शेख हिना,शेख सुलताना, शेख यास्मिन, सलीम खान आदि उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने सय्यद तहेरीम यांनी केली. त्यानंतर नाआत सैय्यद आयेशा वसीम यांनी तर स्वागत गीत मासूमिया डीएलएड कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत शेख फातिमा फिरोज, शेख बुशरा जमीर, शेख राहत आरिफ, निशात जावेद शेख, रुखसाना इर्शाद शेख, सबिया वाजीद शेख,पाशा राबिया अफरोज अहमद यांनी हिंदी उर्दू मराठी व इंग्रजीत स्वतंत्रता सेनानी बहादूर शाह जफर व शहीद अशफाकुल्ला खान यांच्या जीवनातले वेगवेगळ्या घटनांचा आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सादरीकरण केले.

प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बहादूर शाह जफर यांच्या एक शद्बावर त्यावेळी लाखो लोक एक दिलाने इंग्रजाविरुद्ध लढण्यास तयार झाले. मात्र काही गद्दारांनी बहादूर शाह जफर यांच्याबरोबर गद्दरी करुन इंग्रजांच्या बाजूने साथ दिल्याने बहादूर शाह जफर यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना अटक करुन संपूर्ण कुटूंबासहीत काळ्या पाण्याची शिक्षा दिली. व त्यांच्या तीनही मुलांचे मुंडके छाटून व ते ताटात सजवून बहादूर शाह जफर यांना भेट दिले. तरी ते म्हणाले की, देशावर प्रेम असणार्‍यांची मुलं अशाच पद्धतीने समोर येतात. 

त्यांना रंगुन येथे बंदीस्त ठेवण्यात आले होते. चार वर्षानंतर तेथेच त्यांचे देहवासन झाले. नेता सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या शौर्याची जाण ठेवून आझाद हिंद सेनेची स्थापना त्यांच्या कबरीवर शपथ घेऊन केली व त्यावेळी ते म्हणाले होते, देश स्वतंत्र झाल्यावर बहादूर शाह जफर यांच्या इच्छेनुसार त्यांची ही कबर येथून हिंदूस्थानात नेली जाईल. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान सिदरा व शेख अलीशा यांनी केले. प्रास्तविक सैय्यद फरीदा यांनी केले. आभार नौशाद सैय्यद यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.