BJP OBC: भाजपा ओबीसीच्या सरचिटणीसपदी अनिल निकम
BJP OBC: अहमदनगर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या नगर शहर जिल्हा सरचिटणीसपदी अनिल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजीव गाते यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी कल्याण मंत्री ना.अतुल सावे, प्रदेश प्रभारी डॉ.आशिष देशमुख, ओबीसी नगर शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले, राज्यात ओबीसींची मोठी संख्या आहे. ओबीसी समाजाच्या उन्नत्तीसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचा अनेकांना लाभ होत आहेत. ओबीसी मोर्चाचे नगरमध्ये चांगल्या पद्धतीने काम सुरु असून, नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्यावतीने सुरु केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ओबीसी समाजासाठी मोठी फायदेशीर आहे, ही योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकार्यांनी करावे, असे आवाहन करुन नुतन पदाधिकारी अनिल निकम यांना शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर अनिल निकम म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसमाजाला बरोबर घेऊन त्यांच्या उन्नत्तीसाठी विविध योजना राबवित आहेत. अशा सर्वांना बरोबर घेत देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहू, असे सांगितले.
नूतन सरचिटणीस अनिल निकम यांचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.सुजय विखे पा., भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आदिंसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com