Devgao Sarpanch: देवगांवच्या सरपंचपदी झालेली निवड राणीताई शिंदे सार्थ ठरवतील - आ.संग्राम जगताप
Devgao Sarpanch: अहमदनगर (प्रतिनिधी) - सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रासह सध्या महिला भगिनी नोकरी, व्यवसाय करुन कुटूंबाची जबाबदारी पार पाडून, पतीच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करतात. 33 टक्के महिला आरक्षणामुळे राजकारणात देखील महिला आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. सुसंस्कृत व सुशिक्षित अशा सौ.राणीताई शिंदे यांची सरपंचपदी झालेली निवड गावचा विकास करुन सार्थ करतील, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
नगर तालुक्यातील देवगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ.राणी रमेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी. आ.संग्राम जगताप, अरुणकाका जगताप, आ.शिवाजीराव कर्डिले, कृ.उ.बा.स. माजी सभापती विलास शिंदे, युवा उद्योजक रमेश शिंदे, संभाजी पवार, विशाल पवार,विश्वास खिलारी, संतोष खाकाळ, सिद्धार्थ गुंड, सदाशिव भोर आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले, आमचे मित्र युवा उद्योजक रमेश शिंदे यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या पत्नी पदवीधर शिक्षण घेऊन त्यांना व्यावसायात हातभार लावत देवगाव ग्रामस्थांचे प्रश्नही मार्गी लावत असल्याने सौ.शिंदे यांची बिनविरोध निवड सरपंचपदावर झाली. या निवडीमुळे त्यांना काम करण्यास प्रेरणा मिळेल. पदाच्या माध्यमातून ते गाव विकासासाठी प्रयत्न करुन झालेली निवड प्रत्यक्षात कामे करुन सार्थ करुन दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला.
सत्कारास उत्तर देतांना नूतन सरपंच राणीताई शिंदे म्हणाल्या, देवगाव ग्रामस्थांच्या आग्रहामुळे मी हे पद स्विकारले. आमचे मार्गदर्शक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, सासरे माजी सभापती विलास शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करुन पदाला न्याय देईल, असे सांगितले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com