Header Ads

Diwali Faral: आपल्या आनंदात इतरांना सहभाग करुन घेणे ही संस्कृती-भा.ल.जोशी

Diwali Faral: सांगळेगल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ-ड्रेस वाटप

Diwali Faral: आपल्या आनंदात इतरांना सहभाग करुन घेणे ही संस्कृती-भा.ल.जोशी Diwali Faral:  अहमदनगर (प्रतिनिधी)  - आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना मोठे महत्व आहे, या सण-उत्सवातून मानवी जीवन समृद्ध होते. यातील सर्वात मोठा सण हा दिवाळी हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. 


विशेषत: मुलांना दिवाळीचे आकर्षण असते. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करुन घेणे ही आपली संस्कृती. याचाच एक भाग म्हणून प्रशालेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व ड्रेसचे वाटप करुन त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. अभ्यासाबरोबरच उपक्रमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन श्री समर्थ विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष भा.ल.जोशी यांनी केले.


     सांगळेगल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्राथमिक विभागात दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ-ड्रेस वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भा.ल.जोशी, शालेय समितीचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, पत्रकार सुदाम देशमुख, मुख्याध्यापक अजय महाजन आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी म्हणाले,  आपल्या मनाची कवाडे उघडी ठेवून आपल्या आवतीभोवतीअसणार्‍या लोकांची जाणीव ठेवणे त्यांच्या प्रती आपल्या मनात संवेदना ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली पाहिजे. 


दिवाळीत किल्ले बनवणारे ही छोटी मुले मोठी होवून उदयाचा भारत घडवणार आहेत. दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित होवून ही मुले आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला.


     प्रास्तविकात मुख्याध्यापक अजय महाजन यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने सर्वच उपक्रम यशस्वी होत असतात, असे सांगितले. यावेळी पत्रकार सुदाम देशमुख यांनीही या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली माकरे यांनी केले तर आभार शंकर निंबाळकर यांनी मानले. यावेळी सतीश मेढे, संदिप गायकवाड, संगीता पारखे, महेश परदेशी, सुनिता पांडव, हेमलता शिंदे, लिना बंगाळ, प्रमिला आल्हाट, सोनाली कोलते, वैशाली मगर, तिलोत्तमा क्षीरसागर, दिपा सप्तर्षी, अस्मिता गायकवाड, शुभांगी कुलकर्णी आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.