Header Ads

Gulmohar Road: सेंद्रिय भाज्यांची आरोग्यासाठी नितांत गरज - श्रीनिवास बोज्जा

 Gulmohar Road: गुलमोहर रोड येथे वृद्धेश्वर शेतकरी भाजीपाला फिरत्या गाडीचे उदघाटन 

Gulmohar Road: सेंद्रिय भाज्यांची आरोग्यासाठी नितांत गरज - श्रीनिवास बोज्जा Gulmohar Road:  अहमदनगर (प्रतिनिधी)  - वृद्धेश्वर शेतकरी फळे व भाजीपाला फिरत्या विक्री गाडीचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते झाले या वेळी बंडूशेठ विद्ये, राजेंद्र उदागे, पुरषोत्तम सब्बन,वृद्धेश्वर ग्रामपंचायत माजी उपसरपंच नवनाथ पाठक, एकनाथ पाठक,सौ. मीना पाठक, श्रावणी पाठक, राधाकिसन पाठक, सौ.कल्पना पाठक, पुर्वजा बोज्जा आदी उपस्थित होते.

या वेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा म्हणाले आरोग्याच्या हितासाठी सेंद्रिय भाजीपाल्याची गरज असून वृद्धेश्वर शेतकरी यांनी संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करून शेतातून माल ग्राहकापर्यंत उपलब्ध करीत असून ही चांगली गोष्ट आहे, या मुळे नागरिकांचे आरोग्याचा फायदा होऊन आर्थिक नुकसान ही टळेल. 

या साठी नागरिकांना चांगल्या प्रतीचे फळे व भाजीपाला पाहिजे असल्यास वृद्धेश्वर शेतकरी यांचे कडूनच खरेदी करावे असे आवाहन श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

या वेळी उद्योजक बंडूशेठ विद्ये यांनी शुभेच्छा दिल्यात. पाठक कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.