Header Ads

Hazrat Meeravali: मिरावली बाबा दर्गा संदल-उरुस निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न

 Hazrat Meeravali: मिरावली बाबा दर्गा संदल-उरुस निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न


Hazrat Meeravali: मिरावली बाबा दर्गा संदल-उरुस निमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न


    Hazrat Meeravali: अहमदनगर (प्रतिनिधी) - सालाबादप्रमाणे मौजे कापुरवाडी येथील जागृत पीरस्थान हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली पहाड दर्गा च्या संदल-उरुस निमित्ताने चितळे रोड येथील हजरत सय्यद हैदरशाह मिरावली दर्गा वर फुलांची चादर, गलेफ चढवुन चादर मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.


     यावेळी वंशावळ विश्वस्त आसिफखान पीरखान पठाण, विश्वस्त चेअरमन हाजी अन्वर खान, विश्वस्त सय्यद हमीद रुस्तुम, हाजी मोतमोईन जहागिरदार, हाजी खलील चौधरी, करीमभाई वेल्डर, शेख अश्फाक रहेमान, जमीर चेतकवाले, इंजि.इम्रान खान, अर्शद पठाण, सायर पठाण, समीर पठाण, यासीर पठाण, जिशान शेख, शेख सईद पिंपळगाव, शेख शकील, सय्यद असीर, अन्सार बावा, गयासभाई सनईवाले, सोनु रियाज सनईवाले, शफी बारुदवाला आदीं उपस्थित होते.


     यावेळी पीएसआय श्री.इंगळे, सपोनि.राजेंद्र गर्गे, महिला पोलीस संपदा तांबे, सलीम शेख, रिंकु काजळे, हेड कॉन्स्टेबल खेडकर, कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशनचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


      शोभायात्रा चादर मिरवणूक मधे फुलांची चादर, गलेफ असलेले घोडा बग्गी, गाडीला आकर्षक विद्युत रोषणाई, सनई चौघडा गाडी, शोभेचे बारुदकाम, फटाके, विविध बॅण्ड पथक, फकीर जमात च्यावतीने जरब करण्यात आले होते.


     शोभायात्रा मिरवणुक चितळे रोड, नेता सुभाष चौक, तेलीखुंट, एम.जी.रोड, भिंगारवाला चौक मार्गे, जुना कापड बाजार, पिरशाह खुंट, कादरी चौक, रामचंद्र खुंट, झेंडीगेट मार्गेमिरवणुकीने जाऊन पहाटे पहाडावर हजरत मिरावली दर्गा येथे संदल चढविण्यात आले.


     मिरावली पहाड येथे संदलच्या वेळी हजारो भाविक उपस्थित होते भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे स.पो. निरीक्षक दिनकर मुंडे , सचिन धोंडे, दत्तात्रय गव्हाणे व महिला पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विद्युत वितरणाच्या ग्रामीण विभागाकडून संपूर्ण पहाड परिसरात लाईटची व्यवस्था उत्तम होती


     तसेच पहाडावर शुक्रवारी सकाळी 7 वाजता भाविकांसाठी भंडारा लंगरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विश्वस्त, मुजावर (खादीम), मौलाना उपस्थित होते. संपूर्ण दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सर्व धर्मिय हजारो हिंदू-मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला, असे दर्गा विश्वस्त चेअरमन हाजी अन्वर खान यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.