Header Ads

Kanore School: उपक्रमातून हसत खेळत शिक्षण संकल्पना वाढीस लागते : जितेंद्र लांडगे

 Kanore School:  संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनास प्रतिसाद


Kanore School:  संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनास प्रतिसाद   Kanore School: अहमदनगर (प्रतिनिधी)  - कल्याण रोड, ड्रीम सिटी मागील स्वकूळ साळी हितसंवर्धक मंडळ, लक्ष्मीनारायण शिशु मंदिर संचालित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत दिपावली निमित्त कार्यानुव अंतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकाश कंदिल, पणत्या रंगवणे, सजावटीचे वॉलपीस तसेच विविध कागदी वस्तू तयार केल्या. अतिशय आनंदात व खेळमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी या वस्तू तयार केल्या. त्यांच्या चेहर्‍यावर स्व:निर्मितीचा आनंद दिसत होता.


     या तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व ना नफा व ना तोटा या तत्वावर विक्री प्रशालेत करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन जितेंद्र लांडगे, सचिव विक्रम पाठक, संचालक संजय सागांवकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना भामरे, पालक, शिक्षकवृंद उपस्थित होते.


Kanore School: उपक्रमातून हसत खेळत शिक्षण संकल्पना वाढीस लागते : जितेंद्र लांडगे


     याप्रसंगी जितेंद्र लांडगे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील कला प्रत्यक्षात उतराव्यात, त्याचबरोबर हसत खेळत शिक्षण संकल्पना वाढीस लागावी. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे, यासाठी संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साह व पालकांच्या प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान आहे.


     याप्रसंगी विक्रम पाठके, संजय सागांवकर यांनीही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.


     हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली व आपल्या पाल्यांची कला पाहून भारावून गेले. विद्यार्थ्यांनी यावेळी माती विटांपासून सुंदर किल्ले तयार केलेले होते. खूप सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालकांनी कौतुक केले.


     कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कल्पना भामरे व सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.