Karaoke Group: मखदूम व गाता रहे मेरा दिल ग्रुप तर्फे गाणे गाऊन केली वृद्धाश्रमासाठी मोठी मदत जमा
Karaoke Group: अहमदनगर (प्रतिनिधी) : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजामध्ये मोठा बदल होऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असताना पहावयास मिळत आहे ही जरी चांगली बाब असली तरी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात जाण्यास भाग पाडणे किंवा स्वतः आर्थिक खर्च करून त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे हे बदल माणुसकीला व संस्काराला सुन्न करणारे आहे. मुळात समाजात वृद्धाश्रम सारख्या गोष्टी करावे लागतात हीच मोठी शोकांतिका असल्याचे प्रतिपादन जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व गाता रहे मेरा दिल कराओके ग्रुपच्या वतीने नेवासा येथील शरणपूर वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी आबीद दुलेखान, विदया तंन्वर व अमीन धाराणी यांच्या पुढाकाराने वृद्धांच्या चांगल्या दिवाळीसाठी हिंदी गीतांच्या मेहफिलीचे रहमत सुलतान हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, सुफी गायक पवन नाईक, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत वाघ, चित्रपट समीक्षक नंदकिशोर आढाव, शब्दगंधच्या शर्मिला गोसावी, गाता रहे मेरा दिल चे अमीन धाराणी,गुलशन धाराणी, चारुताई शिवकुमार, विदया तंन्वर, आरिफ सय्यद, जावेद मास्टर आदी मान्यवर उपस्थित होते.
या मैफिलीत एडवोकेट गुलशन धाराणी व जयश्री साळवे यांनी धान्य व किराणाची मोठी मदत केली.त्याच प्रमाणे देवदत्त पाऊलबुद्धे, जावेद तांबोळी, कुबेर पतके, नरेश पेवाल व कमल सोप इंडस्ट्रीज चे धिरज भाई व राजु भाई यांनी धान्य कपडे व गृहपयोगी सामानाची मोठी मदत केली. तर गणेश फिरोदिया यांनी मोठ्या प्रमाणात संपूर्ण गोळ्या औषधे दिली. तर रोख स्वरूपात 25 हजार रुपयांची मदत जमा झाली ती सर्व मान्यवरांच्या हस्ते वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर यांच्या सुपुर्द करण्यात आली.
युनुस तांबटकर यांनी मनोगत व्यक्त करताना मखदूम व गाता रहे मेरा दिल ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करून इतरांनाही या मनोरंजनातून मदत कार्य करण्याचे आवाहन केले.
या गीताच्या मैफिलीत अमीन धाराणी, आबीद खान, विदया तंन्वर, युनूसभाई तांबटकर, सुहास भाई मुळे,डॉ अविनाश मंचरकर, डॉ विवेकानंद कंगे, दिनेश मंजरतकर, नरेश पेवाल,
जावेद मास्टर, अभिजीत गायकवाड, सुनील भंडारी,माधवी गुजर, डॉ रेश्मा चेडे, सुनिता धर्माधिकारी, इकबाल बागवान, किरण मैडम आदींनी गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. प्रास्ताविक गुलशन धाराणी यांनी केले. तर आभार दिनेश मंजरतकर यांनी मांनले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com