Header Ads

MIDC: शंकर महाराज प्रकटदीन उत्साहात संपन्न

 MIDC: शंकर महाराज प्रकटदीन उत्साहात संपन्न 

MIDC: शंकर महाराज प्रकटदीन उत्साहात संपन्न         MIDC: अहमदनगर (प्रतिनिधी)  - येथील  मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात शंकर महाराज प्रकटदीन उत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला एफ ७० मध्ये असलेले हे पुरातन क्षेत्र असून गेली ४० वर्षे या ठिकाणी विविध उत्सव संपन्न होतात शंकर महाराजांचे अनुयायी राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला.


 नंतर महिलांनी शंकरगीता सामूहिक पारायण केले दुपारी १२ वा श्रीची महाआरती,पाळणा व जन्मोत्सव करण्यात येऊन नंतर  पालखी मिरवणूक परिसरात काढण्यात आली व महाप्रसाद सुरुवात करण्यात आली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते तर नंतर दिवसभर दर्शन सोहळाभजन संपन्न झाले

 

        प्रकटदिन कार्यक्रम साठी शहरांसह राज्यातून भाविक,भक्त मोठ्या संख्येने दरवर्षी येतात सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती  तसेच या ठिकाणी वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात,तर दर गुरुवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते,शंकर महाराजांचे सर्व उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात

 

        शंकर महाराजची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे.महाराज म्हणत असतआम्ही कैलासाहून आलो!नावही ‘शंकर’ ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार होते .नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे.तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते.पोटी मूल-बाळ नव्हते.ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला.रानात जा. तुला बाळ मिळेल.घेऊन ये. ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. 


        ‘शंकरया माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला.नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला नाम नाही,रूप नाही,एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही.ते अनेक नावांनी वावरत.शंकरया नावाप्रमाणेच सुपड्या’,‘कुंवरस्वामी’,गौरीशंकरअशा नावानीही ते ओळखले जात.


ही नावे कळली एवढेच आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत.नाव’ जसे एक नाहीतसेच त्यांचे ‘रूपही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेखअष्टावक्र’ असाही केलेला आढळतो.डोळे मोठे होते,ते अजानुबाहू होते,त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती.हे असे रूप!वेगळ्या अर्थानेबहुरूपी होते    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.