Header Ads

Molana Azad Mahotsav: मौलाना आझाद महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सैय्यद खलील तर सचिव निसार बागवान

 Molana Azad Mahotsav: मौलाना आझाद महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सैय्यद खलील तर सचिव निसार बागवान

Molana Azad Mahotsav: मौलाना आझाद महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सैय्यद खलील तर सचिव निसार बागवान Molana Azad Mahotsav: अहमदनगर- भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्यावतीने 23 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ‘कौमी एकता सप्ताह’चे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समितीचे गठन करण्यात आले असून सर्वोनुमते या समितीच्या अध्यक्षपदी तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खालील अ. करीम यांची तर सचिवपदी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सदस्य निसार बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली.

समितीतील इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे 

उपाध्यक्ष - इंजि.अनिस शेख, इंजि. इकबाल सय्यद, संजय झिंजे सहसचिव - तन्वीर चष्मावाला, आर्कि. फिरोज शेख, खजिनदार - शफकत सैय्यद नईम सरदार, 

सदस्य - शेख अयाज, अतिकभाई शेख, शेख फैय्याज (मा.नगरसेवक), सय्यद आरिफ, सय्यद वहाब, शेख तारिक, शेख इकबाल मुबारक, शेख आदिल रियाज, राजूभाई शेख, जावेद तांबोळी, जावेद मास्टर, इंजि.इम्रान खान, 

सल्लागार - हाजी शौकतभाई तांबोली, युनूसभाई तांबटकर,भैरवनाथ वाकळे,प्रा.डॉ. सलाम सर,इंजि. अभिजित एकनाथ वाघ, प्रा. डॉ. महेबुब सय्यद, शरफुद्दीन सर, सलीम यावर, अबरार शेख यांची निवड करण्यात आली आहे.

या संपूर्ण सप्ताहामध्ये सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून व्याख्यानही घेतले जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यां व्यतिरिक्त पालकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान व डॉ. कमर सुरूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.