Molana Azad: मौलाना आजाद यांनी शस्त्र हाती न घेताही क्रांती करता येते हे जगाला पटवून दिले - सैय्यद खलील

Darshak
0

Molana Azad: बाल साहित्य उर्दू विशेषांकाचे मखदुम सोसायटीच्या वतीने मोफत वाटप

Molana Azad: मौलाना आजाद यांनी शस्त्र हाती न घेताही क्रांती करता येते हे जगाला पटवून दिले - सैय्यद खलील
Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) - स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करताना या महात्म्याला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा नव्याने अभ्यास करण्याीच गरजही जाणून घ्यायला हवी. विशेषत: हिंसाचाराचे दशवतार पहायला मिळत असतांना शेवटच्या श्‍वासापर्यंत शांततेचा मंत्र जपणार्‍या मौलाना आजाद यांच्या विचारांचा मागोवा घेणे समयोजित ठरेल.

 मौलाना आजाद यांनी आयुष्यभर अहिंसात्मक लढ्याला महत्व दिले. शस्त्र हाती ना घेताही क्रांती करता येते हे जगाला पटवून दिले, असे प्रतिपादन मौलाना आजाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी केले.

मखदुम सोसायटी व मराठा सेवासंघ च्यावतीने मौलाना आजाद यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या अखिल भारतीय उर्दू विकास परिषदेचे उर्दूमध्ये ‘बच्चों की दुनिया’ हे मासिक प्रकाशित होते. त्याचे 1000 अंकांचे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान,डॉ कमर सुरुर, शरफुद्दीन सर, तनवीर चष्मावाला, अयाज गफुर, सय्यद आरिफ, एफ एन ब्रदर्स,निसार बागवान, अलकरम सोसायटी व शफाकत सय्यद यांच्या पुढाकाराने सर्व उर्दू शाळेत मोफत वितरण करण्यात येणार आहे.

त्याची सुरवात जिल्हा परिषद उर्दू स्कूल फकीरवाडा येथुन करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम बाजी व सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व हा अंक प्रत्येक महिन्याला उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.

मौलाना अबुल कलाम आझाद महोत्सव समितीचे सचिव निसार बागवान यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,सध्या किरकोळ कारणावरुन हिंसेचे प्रयत्न वाढीस लागत असतांना मौलाना आजाद यांच्या अहिसेंच्या विचारांचे महत्व लक्षात घेता लहान वयापासूनच मुलांमध्ये वाचण्याच्या माध्यमातून रुजविल्यास भविष्यात येणार्‍या नवीन पिढी अहिंसेचे मार्गानेच पुढे जाईल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार शफकत सैय्यद यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)