Header Ads

Nashik Vibhag Election: शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी - प्राचार्य सुनिल पंडित

 Nashik Vibhag Election: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

Nashik Vibhag Election: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद     Nashik Vibhag Election: अहमदनगर (प्रतिनिधी)    - महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जून 2014 मध्ये होत आहे. या मतदार संघाच्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पसंतीचा अधिकृत उमेदवार देणार आहे.


 तरी या मतदारसंघात एकूण महाराष्ट्रामध्ये शिक्षक परिषदेला प्रदीर्घ अनुभव आहे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही नेहमी अग्रस्थानी असते, त्यामुळे परिषदेने आतापर्यंत कार्यक्षम कार्यसम्राट आमदार राज्यात दिलेले आहेत. या माध्यमातून सर्व शिक्षक प्रश्न सोडवण्यासाठी संघटना कार्यरत असल्याचे सांगून नगरमध्ये मतदार नोंदणी अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित यांनी दिली.


     नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानास नगरमध्ये प्रारंभ करण्यात आला. यावेळी बुर्‍हाणनगर येथील बाणेश्वर विद्यालयातील शिक्षकांना नोंदणी अर्ज देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष सुनिल पंडित, प्राचार्य काशिनाथ हापसे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुरेशरव सुंबे, व्हाईस चेअरम संतोष आमले, सोनेवाडीचे सरपंच विठ्ठल दळवी, बी.डी.शिकारे, आर.वाय.झावरे, सौ.एस.डी.वाघ, एस.जी.चिलवंत, डी.एस.दरेकर, नम्रता गिरवले आदि उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचीही भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.


     या विषयी अधिक माहिती देतांना प्राचार्य सुनिल पंडित म्हणाले, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते,  शाळेवर येऊन आपणाशी संवाद साधणार आहेत. तरी या मतदार संवाद साधून नावे नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नोंदणी अभियान राबवित आहे. मुंबई व नाशिक विधान परिषद शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर 2023 व 23 नोंव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत मतदार नोंदणी करण्यात येणार असून, शिक्षकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


     1 नोव्हेंबर 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षातील किमान तीन वर्षेमाध्यम कमी दर्जा नसलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षक असावा.  मतदार म्हणून नोंदणीसाठी रहिवासी पुरावा, आदी विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र, कागदपत्रांतील नावात बदल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित कायदेशीर पुरावा जोडावा. मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज क्र. 19 त्यासोबत सर्व आवश्यक पदनिर्देशित अधिकार्‍यांकडून करून जोडणे आवश्यक आहे. नोंदणीसाठीचा अर्ज हा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या या लशे.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर  तसेच जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी तहसिलदार यांच्या कार्यालय उपलब्ध आहे.


     तरी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, तांत्रिक विद्यालय, टेक्निकल टायपिंक इन्स्टिट्युट,  इंग्रजी माध्यमाच्या सोबत विहित नमुना अर्ज 19 भरुन तहसील कार्यालयात मुख्यध्यापकांच्या कव्हरिंग लेटरसह जमा करुन पोहोच घ्यावी, असे आवाहन  प्राचार्य सुनिल पंडित यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.