NCP Ajit Pawar: बारामती लोकसभा जागेसाठी अजित पवार गट इच्छुक ; एकूण नऊ जागांची मागणी संभाव्य यादी जाहीर

Darshak
0

NCP Ajit Pawar: बारामती लोकसभा जागेसाठी अजित पवार गट इच्छुक ; एकूण नऊ जागांची मागणी संभाव्य यादी जाहीर 

NCP Ajit Pawar: बारामती लोकसभा जागेसाठी अजित पवार गट इच्छुक ; एकूण नऊ जागांची मागणी संभाव्य यादी जाहीर



खासदार सुप्रिया सुळे यांना भाऊबीज गिफ्ट म्हणून अजित पवार यांनी बारामती लोकसभा जागेवर दावा केला असल्याचे समजते आणि या जागेवर सुनेत्रा पवार यांना अजित पवार गट राष्ट्रवादी उभे करणार आणि बारामतीहुन निवडून येणाऱ्या शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर राजकीय विरुद्ध पारिवारिक लढा उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. 


राष्ट्रवादीकडील सध्या असणाऱ्या चार जागां व्यतिरिक्त आणखी पाच जागा अजित पवार गटनी मागितल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छ.संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही असल्याचे समजते.


रायगड लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांचे नाव समोर येत आहे. या जागेवर भाजपने सुद्धा दावा केला आहे.


संभाव्य उमेदवारांची नावे

बारामती – सुनेत्रा पवार

सातारा – रामराजे नाईक निंबाळकर

रायगड – सुनिल तटकरे

शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील

दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा

परभणी- राजेश विटेकर

भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल

धाराशिव – राणा जगजितसिंह

छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण


लोकसभेसाठी जय्यत तयारी

अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी गट हे निवडणुकींच्या पार्शवभूमीवर जोमाने कामाला लागलेले दिसत आहे  आणि दादा कधी-कधी नाराज होतात हेही आपण पाहतो आणि नाराज झाल्यावर काय होते हेही आपण पाहिले.  राजकीय घडामोडीत सत्तेत दादा नाराज झाले तर त्याचे निकाल आपण पाहिले तथापि आगामी निवडणुकांचे निकाल राजकीय आणि पारिवारिक संघर्ष वाढवतील असे सध्या तरी दिसत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top